शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोना रुग्णांनी गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:24 AM

विदर्भात नागपूर हे कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) गुरुवारी मध्यरात्री तपासलेल्या नमुन्यात एक, शुक्रवारी तपासलेल्या नमुन्यात चार तर पहिल्यांदाच निरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात एक पॉझिटिव्ह आल्याने तसेच अन्य एक ,अशी रुग्णांची संख्या सातवर गेली.

ठळक मुद्देसात रुग्ण पॉझिटिव्ह : रुग्णांची संख्या १०५

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात नागपूर हे कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) गुरुवारी मध्यरात्री तपासलेल्या नमुन्यात एक, शुक्रवारी तपासलेल्या नमुन्यात चार तर पहिल्यांदाच निरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात एक पॉझिटिव्ह आल्याने तसेच अन्य एक ,अशी रुग्णांची संख्या सातवर गेली. कोरोना रुग्णाने शंभरी गाठली असून ही संख्या १०५ वर पोहचली आहे. नागपुरसाठी काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे, आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मेडिकलमधून सात रुग्ण कोरोनामुक्त झाले. नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत असलीतरी पुणे, मुंबई व नाशिकच्या तुलनेत बाधित रुग्णांची गती कमी आहे. यामुळे शंभरी गाठायला ४४ दिवस लागले. गुरुवारी मध्यरात्री एम्समध्ये मोमीनपुरा येथील ५२वर्षीय पुरुषाचा नमुना पॉझिटिव्ह आला. मोमीनपुरा येथीलच बाधित रुग्णाचा संपर्कात ते आले असल्याचे सांगण्यात येते. एम्स प्रयोगशाळेतच आज तपासलेलया ३४ नमुन्यांमधून चार पॉझटिव्ह आले. यात ३३वर्षीय पुरुष, पाच वर्षीय मुलगा, ३५ व ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे चारही रुग्ण मोमीनपुरा येथील रहिवासी असून गेल्या काही दिवसांपासून त्यांना वनामती येथे क्वारंटाइन करण्यान आले होते. नीरी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेला एक नमुना हा ५० वर्षीय महिलेचा असून ती सतरंजीपुरा येथील रहिवासी आहे. -चार पॉझिटिव्ह रुग्ण गंभीरमेडिकलमध्ये ३५ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यात ८०वर्षीय वृद्धासह आणखी चार रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी यांनी याला दुजोरा दिला आहे. ते व त्यांच्या डॉक्टरांची चमू या रुग्णांकडे लक्ष ठेवून आहेत. तुर्तासतरी या रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडलेली नसल्याचे सांगण्यात येते. उर्वरित रुग्णांमध्ये लक्षणे नसून प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित २२३दैनिक तपासणी नमुने ७७दैनिक निगेटिव्ह नमुने ७१नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १०५नागपुरातील मृत्यू ०१डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण २२डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १२३३कॉरन्टाईन कक्षात एकूण संशयित ६९४पीडित-१०५-दुरुस्त-२२-मृत्यू-१

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर