शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

CoronaVirus in Nagpur : मृत्यूदर १.८८ टक्के तर, पॉझिटिव्हीटी दर १.७५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 8:27 PM

Corona virus, Nagpur news कोरोनाचे संकट टळले नसलेतरी स्थिती नियंत्रणात आली आहे. शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात १९७ रुग्ण व १० मृत्यूची नोंद झाली. मृत्यूदर १.८८ टक्के तर पॉझिटिव्हीटीचा दर १.७५ टक्क्यांवर आला आहे. आज शहरात १२० रुग्ण व ५ मृत्यू तर ग्रामीण भागात ७३ रुग्ण व १ मृत्यू नोंदविण्यात आले . रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७. १६ टक्क्यांवर पोहचले आहे.

ठळक मुद्देकोरोना नियंत्रणात : १९७ रुग्ण, १० मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे संकट टळले नसलेतरी स्थिती नियंत्रणात आली आहे. शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात १९७ रुग्ण व १० मृत्यूची नोंद झाली. मृत्यूदर १.८८ टक्के तर पॉझिटिव्हीटीचा दर १.७५ टक्क्यांवर आला आहे. आज शहरात १२० रुग्ण व ५ मृत्यू तर ग्रामीण भागात ७३ रुग्ण व १ मृत्यू नोंदविण्यात आले . रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७. १६ टक्क्यांवर पोहचले आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत चालला आहे. या धर्तीवर लवकरच कडक निर्बंध शिथील केले जाणार आहेत. यामुळे प्रत्येकाची जबाबदारी वाढणार आहे. पूर्वीपेक्षा अधिक सतर्क राहून कोरोना नियमांचे पालन करण्याचे व कोरोनाचा तिसºया लाटेला दूर ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. आज ११३५४ चाचण्या झाल्या. यात शहरात ८५४५ तर ग्रामीण भागात २८०९ चाचण्यांचा समावेश होता. शहरात आतापर्यंत ३,३१,५५६ रुग्ण व ५२६० मृत्यूची नोंद झाली, तर ग्रामीणमध्ये १,४२,२७५ रुग्ण व २२९७ रुग्णाचे बळी गेले आहेत. जिल्हाबाहेरील १५६८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यातील १३८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत तपासले २८ लाख नमुने

कोरोना संसर्गाचा दीड वर्षाचा कालावधीत नागपूर जिल्ह्यात २८, ४६, ८१३ नमुने तपासण्यात आले. यात २०,१२,९७८ आरटीपीसीआर तर ८,३३,८३५ रॅपीड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. सर्वाधिक तपासण्या मेयो, मेडिकल, एम्स, निरी व नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत झाल्या.

कोरोनाचे १६३३ रुग्ण भरती

सध्या शासकीयसह खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये एकूण १६३३ रुग्ण भरती आहेत. २९४२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आतापर्यंत मेडिकलमधून १०,५१४, मेयोमधून १०,४९५, एम्समधून २,५६३, लता मंगेशकर हॉस्पिटलमधून २३३६, शालिनीताई मेघे हॉस्पिटलमधून २,६२४ यांच्यासह ४,६१,८८१ रुग्ण बरे झाले आहेत.

 कोरोनाची शुक्रवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ११,३५४

शहर : १२० रुग्ण व ५ मृत्यू

ग्रामीण : ७३ रुग्ण व १ मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,७५,३९९

ए. सक्रीय रुग्ण : ४५७५

ए. बरे झालेले रुग्ण : ४,६१,८८१

ए. मृत्यू : ८,९४३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर