शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

CoronaVirus in Nagpur :नागपूर जिल्ह्यात केवळ ९ मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:21 PM

Corona Virus Death Toll Controlling, Nagpur Newsकोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात ६४वर गेलेली मृतांची संख्या शनिवारी १७ वर आली. यातही ९ मृत्यू हे जिल्ह्यातील रुग्णांचे असून उर्वरित ८ जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्याबाहेरील रुग्णांचे ८ मृत्यू : ६२७ नव्या रुग्णांची भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात ६४वर गेलेली मृतांची संख्या शनिवारी १७ वर आली. यातही ९ मृत्यू हे जिल्ह्यातील रुग्णांचे असून उर्वरित ८ जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत. आज ६,५४०वर चाचण्या झाल्या असताना ६२७ बाधितांची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ८६,०९० झाली तर मृतांची संख्या २,७६७ वर पोहचली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समधानकारक बाब म्हणजे, दिवसेंदिवस उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला १४ हजारांवर रुग्ण उपचार घेत होते. सध्या ८,६०६ रुग्ण विविध शासकीय, खासगी हॉस्पिटलसह होम आयसोलेशनमध्ये आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक राहत आहे. आज ८३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८६.७७ टक्क्यांवर गेले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४१८, ग्रामीण भागातील २०१ तर ८ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.२,८९५ अ‍ॅन्टिजेन चाचणीतून २६२ बाधितनागपूर जिल्ह्यात २,८९५ रुग्णांची रॅपिड अन्टिजेन चाचणी करण्यात आली. यात २६२ रुग्ण बाधित तर २६३३ रुग्ण निगेटिव्ह आले. इतर प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचणीतून ३६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एम्सच्या प्रयोगशाळेतून १५, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून २९, मेयोच्या प्रयोगशाळेतून ६६, माफसूच्या प्रयोगशाळेतून ४४, नीरीच्या प्रयोगशाळेतून २७, खासगी प्रयोगशाळेतून २६२ रुग्णांची नोंद झाली.कोविड केअर सेंटर रिकामे होण्याच्या मार्गावरबाधितांची संख्या कमी होताच कोविड केअर सेंटरही रिकामे होऊ लागले आहेत. लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या आणि घरी होम आयसोलेशनची सोय नसलेल्या रुग्णांसाठी हे सेंटर आहेत. जिल्ह्यात १९ सेंटर आहेत. सध्या यातील सहा सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. शहरातील पाचपावली सेंटरमध्ये ८०, आमदार निवासात ५२ तर व्हीएनआयटीमध्ये १५ रुग्ण आहेत. इतर कोविड केअर सेंटरमध्ये १५ ते ३० रुग्ण दाखल आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ६,५४०बाधित रुग्ण : ८६,०९०बरे झालेले : ७४,७१७उपचार घेत असलेले रुग्ण : ८,६०६मृत्यू : २,७६७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूnagpurनागपूर