लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी वाढत असताना नागपुरात बुधवारी कोरोनाचा उद्रेक झाला. तब्बल ८६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ८६३ वर पोहचली आहे. यापूर्वी नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद ६ मे रोजी ६८ होती. तीन महिन्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्याने आरोग्य यंत्रणेत चिंता वाढली आहे. धक्कादायक म्हणजे, यातील ७२ रुग्ण एकट्या नाईक तलाव, बांगलादेश वसाहतीतील आहेत. सतरंजीपुरा, मोमीनपुरा नंतर आज नाईक तलाव, बांगलादेश वसाहतीत रुग्णांचा ब्लास्ट झाला आहे. नागपुरात ११ मार्च रोजी पहिल्या रुग्णाची नोंद झाली. या महिन्यात केवळ १६ रुग्ण पॉझिटिव्ह होते. एप्रिल महिन्यात १२१ रुग्णांची नोंद असताना मे महिन्यात ४०५ रुग्णांची नोंद झाली. यातही ६ मे रोजी ६८, ७ मे रोजी ३८, २९ मे रोजी ४३ रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. जून महिन्याच्या १० दिवसात ३२३ रुग्णांची नोंद झाली. यातही ३ जून रोजी ३०, ५ जून रोजी ५६, ८ जून रोजी ३१, ९ जून रोजी ४२ तर १० जून रोजी ८६ रुग्णसंख्येचा उच्चांक होता. वाढत्या रुग्णसंख्येने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. एका रुग्णाच्या संसर्गाची साखळी संपुष्टात येत असताना १० नव्या रुग्णांच्या संपर्काची साखळी सुरू होत असल्याने व रोज नव्या वसाहतीतून रुग्णांची नोंद होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे.नाईक तलाव, बांगलादेश वसाहतीत १५७ रुग्णसतरंजीपुरा येथील एका रुग्णाच्या मृत्यूनंतर या वसाहतीतून सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत ११५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. येथील रुग्णांची संख्या कमी होत असताना मोमीनपुरा वसाहतीने या वसाहतीला रुग्णांच्या संख्येत मागे टाकले. मोमीनपुरामध्ये आतापर्यंत २२९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर बांगलादेश, नाईक तलाव वसाहतीत सुरुवातीला एक-दोन रुग्णाची नोंद होत असताना मागील आठवड्यापासून सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी ७२ रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत या वसाहतीतून १५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण व्हीएनआयटी येथे क्वारंटाईन होते.इसासनी गावातही कोरोनाचा शिरकावहिंगणा तालुक्यातील लोकमान्यनगरात तीन रुग्णाची नोंद झाल्यानंतर रुग्णसंख्या स्थिर झाली होती. परंतु आज याच तालुक्यातील इसासनीमध्ये सात रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांना आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आले होते. याशिवाय सतरंजीपुरा येथून पुन्हा सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे रुग्ण पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन होते. मोमीनपुरा येथील एक सारीचा रुग्ण पॉझिटिव्ह आला असून, मेयोमध्ये उपचार सुरू आहेत.२२ रुग्णांना डिस्चार्जमेयोतून १२, मेडिकलमधून १० तर एम्समधून २ अशा २२ रुग्णांना डिस्चार्ज म्हणजे रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात मोमीनपुरा येथील तीन, तांडापेठ येथील एक, नाईक तलाव येथील दोन, मोमीनपुरा येथील तीन, लोकमान्यनगर येथील दोन तर नरखेड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण मेयोत उपचार घेत होते. मेडिकलमधून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांमध्ये गड्डीगोदाम येथील एक, लक्ष्मीनगर येथील एक, कोराडी येथील तीन, मोमीनपुरा येथील एक, बांगलादेश वसाहतीतील तीन रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ५४३ झाली आहे.आतापर्यंतचा रुग्णसंख्येचा उच्चांक ६ मे ६८ रुग्ण ७ मे ३८ रुग्ण २९ मे ४३ रुग्ण ३ जून ३० रुग्ण ५ जून ५६ रुग्ण ८ जून ३१ रुग्ण ९जून ४२ रुग्ण१० जून ८५ रुग्णकोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १६२दैनिक तपासणी नमुने ४७६दैनिक निगेटिव्ह नमुने ३९१नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ८६३नागपुरातील मृत्यू १५डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ५४३डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३२४४क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १८५१पीडित - ८६३ - दुरुस्त - ५४३- मृत्यू-१५
CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा उद्रेक, ८६ रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:19 PM
लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी वाढत असताना नागपुरात बुधवारी कोरोनाचा उद्रेक झाला. तब्बल ८६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ८६३ वर पोहचली आहे.
ठळक मुद्देतीन महिन्यात रुग्णसंख्येचा उच्चांक : रुग्णांची संख्या ८६३मोमीनपुरानंतर नाईक तलाव-बांगलादेश वस्तीत रुग्णांचा ब्लास्ट