लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केरळ येथून आलेला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेन्टल) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबतची लक्षणे आढळून आल्याने, मंगळवारी मेयोत तपासणी करण्यात आली. परंतु त्याचे नमुने घेण्यात आले नाही. या प्रकरणाने डेन्टलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.डेन्टलमध्ये केवळ आकस्मिक विभाग सुरू आहे. परंतु सर्व डॉक्टरांंना दिवसभर थांबावे लागते. या डॉक्टरांसाठी ‘थ्री लेअर मास्क’चीही सोय नाही. यातच मंगळवारी कृत्रिम दंत विभागातील एक पीजीचा विद्यार्थी जो काही दिवसांपूर्वी केरळ येथून आला त्याच्यामध्ये लक्षणे आढळून आल्याने खळबळ उडाली. या विभागाचे प्रमुख डॉ. खळीकर यांनी सांगितले, वैद्यकीय परिषदेसाठी हा विद्यार्थी केरळला गेला होता. काही दिवसापूर्वी तो नागपुरात आला. दोन दिवसापूर्वी त्याला घसा दुखण्याचा त्रास सुरू झाला. काहींच्या लक्षात आल्यावर त्याला मंगळवारी मेयोत पाठविण्यात आले. त्याची तपासणी झाली. परंतु नमुने घेण्यात आलेले नाही. सध्या त्याला आपल्या खोलीतच राहण्यास सांगितले आहे.
Corona virus : नागपुरात डेन्टलमध्ये एक विद्यार्थी संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:41 PM
केरळ येथून आलेला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेन्टल) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबतची लक्षणे आढळून आल्याने, मंगळवारी मेयोत तपासणी करण्यात आली.
ठळक मुद्देकेरळ प्रवास करून आला होता : मेयोने घेतले नाहीत नमुने