शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

Corona virus : नागपुरात संशयित रुग्णांचीही प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:35 AM

मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत १४८ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यातील सर्वच रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले असून त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ठळक मुद्देमेयोच्या प्रयोगशाळेत २३ नमुने : पहिल्या टप्प्यातील आठ नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत १४८ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यातील सर्वच रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले असून त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या संशयितांच्या प्रकृतीवर १४ दिवस लक्ष ठेवले जाते. त्यानुसार या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. प्रत्येक रुग्ण खबरदारीचे सर्व उपाय करीत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. शनिवारी दिवसभरात २३ नमुने मेयोच्या प्रयोगशाळेला प्राप्त झाले. यातील पहिल्या टप्प्यात तपासण्यात आलेले ८ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आले तर उर्वरीत १५ नमुन्यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपुरात शनिवारपासून ‘लॉकडाऊन’ केले. त्यानुसार बहुसंख्य नागरिक घरातच होते. आवश्यक कामासाठी बाहेर पडणारे लोक तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून निघाले होते. ‘हॅण्ड सॅनिटायझर’ वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी ‘जनता कर्फ्यू’ही आहे. यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास काही प्रमाणात यश येण्याची शक्यता आहे. नागपुरात आतापर्यंत २४७ कोरोना संशयित रुग्ण आढळून आले असून यातील १४८ रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. यातील चार रुग्ण सोडल्यास इतर सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले. यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या सर्वांच्या प्रकृतीवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. शनिवारी पहिल्या टप्प्यात गडचिरोली येथून दोन, अकोल्यातून चार, मेडिकल व मेयोमधून प्रत्येकी एक-एक संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात आले. दुपारपर्यंत या सर्व नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले.यवतमाळ, गडचिरोलीतून प्रत्येकी दोन तर सेवाग्राममधून तीन नमुनेमेयोच्या प्रयोगशाळेला दुसऱ्या टप्प्यात १५ नमुने प्राप्त झाले. यात मेडिकलमधील चार, मेयोमधील तीन, सेवाग्राममधील तीन, यवतमाळ व गडचिरोलीमधील प्रत्येकी दोन तर भंडारामधील एक नमुन्यांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत यांच्या नमुन्यांचा अहवाल येण्याची शक्यता आहे.मेयोत तीन तर मेडिकलमध्ये चार नवे संशयित रुग्ण दाखलमेडिकलमध्ये आज चार नवे संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. यात १९ वर्षीय युवती ही लंडन येथून तर २२ वर्षीय युवक हा थायलँड येथून प्रवास करून आला आहे. उर्वरित दोनमध्ये एक ३८ वर्षीय व ३१ वर्षीय पुरुष हे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. या शिवाय, शुक्रवारी भरती झालेला एक असे पाच रुग्णभरती आहेत. तर मेयोमध्ये तीन नवे संशयित रुग्ण उपचार घेत आहेत.‘होम कॉरन्टाईन’ केलेल्या रुग्णांची दोन वेळा चौकशीज्या संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत त्यांना रुग्णालयातून सुटी देऊन घरीच थांबण्याचा सल्ला दिला जातो. अशा रुग्णांच्या प्रकृतीची दिवसातून दोन वेळा चौकशी केली जाते. त्यानुसार सर्वच रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. ‘होम कॉरन्टाईन’ केलेल्या १४८ रुग्णांमधून केवळ चार रुग्ण मेयो, मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत.डॉ. देवेंद्र पातुरकरजिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय