लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोनाची साथ नियंत्रणात येत आहे. रुग्णांसोबतच मृत्यूची संख्या कमी व्हायला लागली आहे. शनिवारी ३६ रुग्णांच्या मृत्यूची तर १,१५४ रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, मागील आठ महिन्यात मृत्यूच्या संख्येने आज पाच हजाराचा टप्पा गाठला. मृतांची एकूण संख्या ५,०२१ वर पाेहचली. तर रुग्णांची एकूण संख्या १,८५,०११ झाली. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.७१ टक्के आहे. सर्वाधिक मृत्यूची नोंद नागपुरात जिल्ह्यात झाली असून दुसऱ्या क्रमांकावर अमरावती जिल्हा आहे. सर्वात कमी मृत्यू गडचिरोली जिल्ह्यात झाले आहेत.
नागपूर जिल्ह्यात ३६९ नव्या रुग्णांची भर पडली असून १९ मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ९३,४२४ झाली तर मृतांची संख्या ३०४६ वर गेली. अमरावती जिल्ह्यात ६१ बाधित रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या १५,९०० झाली. एका रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या ३५८ वर पोहचली. चंद्रपूर जिल्ह्यात १९७ रुग्ण पॉझिटिव्ह तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या १४,५८४ झाली असून मृतांची संख्या २१७ वर गेली. गडचिरोली जिल्ह्यात १०२ रुग्ण व दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ५,१८० तर मृतांची संख्या ४८ झाली. बुलडाणा जिल्ह्यात ९१ रुग्ण व एका रुग्णाचा बळी गेला. रुग्णसंख्या ८,९६७ तर मृतांची संख्या १२० वर पोहचली आहे. वर्धा जिल्ह्यात ५३ रुग्ण व तीन मृत्यू झाले. मृतांची एकूण संख्या १९६ झाली. वाशिम जिल्ह्यात २१ बाधित व चार मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात मृतांची संख्या १२७ झाली. यवतमाळ जिल्ह्यात ५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. येथील मृत्यूसंख्या ३२० झाली. भंडारा जिल्ह्यात ८७ रुग्ण व दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ७,९६४ तर मृतांची संख्या २०१ झाली. गोंदिया जिल्ह्यात ८५ रुग्णांची नोंद व एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांची संख्या ११८ वर गेली आहे. अकोला जिल्ह्यात ३१ नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात मृतांची संख्या २७० आहे.
असे वाढले मृत्यू
मार्च ०१
एप्रिल १२
मे ५४
जून ९१
जुलै २२९
ऑगस्ट १२०२
सप्टेंबर २४०८
ऑक्टोबर १०२४
(२४ पर्यंत)