लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्याही विषाणूच्या संक्रमणाच्या संकटाने रेल्वे मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने १८ मार्च ते १ एप्रिलपर्यंत २३ रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जनहितार्थ घेतलेल्या निर्णयामुळे रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.लांब पल्ला आणि जास्त वेळेच्या रेल्वेत शेकडो प्रवासी एकाच वेळी प्रवास करतात. याशिवाय स्थानकांवर अनेक अन्य रेल्वे पोहोचताच प्रवाशांसह अन्य लोकांचीही गर्दी दिसून येते. स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेताना प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर मंगळवार, १८ मार्चपासून १६ एप्रिलपर्यंत वाढवून (मध्य रेल्वेचे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, बल्लारशाह, बैतूल व सेवाग्राम स्थानक) ५० रुपये करण्यात आले आहे.रद्द करण्यात आलेल्या रेल्वे११००७ मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस १९ ते ३१ मार्च११००८ पुणे-मुंबई डेक्कन एक्स्पे्रस १९ ते ३० मार्च११२०१ एलटीटी-अजनी एक्स्प्रेस २३ मार्च व ३० मार्च११२०२ अजनी-एलटीटी २० व २७ मार्च११२०५ एलटीटी-निजामाबाद २१ व २८ मार्च११२०६ निजामाबाद-एलटीटी २२ व २९ मार्च२२१३५/२२१३६ नागपूर-रिवा २५ मार्च११४०१ मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस २३ मार्च ते १ एप्रिल११४०२ नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस २२ ते ३१ मार्च११४१७ पुणे-नागपूर २६ मार्च व २ एप्रिल११४१८ नागपूर-पुणे २० व २७ मार्च२२१३९ पुणे-अजनी २१ व २८ मार्च२२१४० अजनी-पुणे २२ व २९ मार्च१२११७/१२११८ एलटीटी-मनमाड १८ ते ३१ मार्च१२१२५ मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस १८ ते ३१ मार्च१२१२६ पुणे-मुंबई १९ मार्च ते १ एप्रिल२२१११ भुसावळ-नागपूर १८ ते २९ मार्च२२११२ नागपूर-भुसावळ १९ ते ३० मार्च११३०७/११३०८ कलबुर्गी-सिकंदराबाद १८ ते ३१ मार्च१२२६२ हावडा-मुंबई दुरंतो २४ व ३१ मार्च१२२६१ मुंबई-हावडा २५ मार्च व १ एप्रिल२२२२१ सीएसटीएम-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस २०, २३, २७ व ३० मार्च२२२२२ निजामुद्दीन-सीएसटीएम २१, २४, २६ व ३१ मार्च
कोरोनाचा रेल्वेवर कहर, २३ रेल्वे आजपासून रद्द : प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:45 PM
रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्याही विषाणूच्या संक्रमणाच्या संकटाने रेल्वे मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने १८ मार्च ते १ एप्रिलपर्यंत २३ रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देरेल्वे प्रवाशांना अडचणी