लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुलडाण्यात शनिवारी मृत्यू झालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचे नमुने रविवारी पॉझिटिव्ह आल्याने विदर्भात पहिल्या कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली. यासह नागपुरात आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत नागपुरात १४, यवतमाळ जिल्ह्यात चार, गोंदिया जिल्ह्यात व बुलडाण्यात एक-एक असे विदर्भात एकूण रुग्णांची संख्या १९वर पोहचली आहे. मृतक दोन दिवस एका खासगी इस्पितळात भरती होता. शनिवारी अचानक प्रकृती खालवली. यामुळे बुलडाण्याीलच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोन तासांतच त्यांचा मृत्यू झाला. नमुने नागपूरच्या मेयोमध्ये पाठविले असता रविवार पॉझिटिव्ह अहवाला आला. या मृताची विदेश किंवा देशांतर्गत प्रवासाची पार्श्वभूमी नाही. मात्र कुठल्यातरी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात ते आले असावे अशी शंका वर्तवली जात आहे. याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते मधुमेहानेपिडीत असल्याचेही सामोर आले आहे. नागपुरात आज नोंद झालेल्या तीन रुग्णात एक ११ वर्षाचा मुलीचा समावेश आहे. २६ मार्च रोजी दिल्ली प्रवासाचा इतिहास असलेल्या बाधित रुग्णाचा ५० वर्षी नातेवाइक शनिवारी पॉझिटिव्ह आढळून आला. त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियाची तपासणी केली असता त्यांची ही मुलगी व ४५ वर्षीय भाऊ रविवारी पॉझिटिव्ह आढळून आला. या शिवाय, दिल्ली प्रवासावरून आलेला ३५ वर्षीय व्यक्तीलाही कोरोना विषाणूचीबाधा झाल्याचे अहवालावरून निष्पन्न झाले. सध्या मेयोमध्ये आठ तर मेडिकलमध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
Corona Virus in Nagpur; विदर्भात कोरोनाचा पहिला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 3:38 PM
बुलडाण्यात शनिवारी मृत्यू झालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचे नमुने रविवारी पॉझिटिव्ह आल्याने विदर्भात पहिल्या कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली.
ठळक मुद्देविदर्भात रुग्णाची संख्या पोहचली १९ वरनागपुरात तीन तर बुलढाण्यात एक बाधित