लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात शुक्रवारी एकाच दिवशी ४३ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. यात महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यामुळे उपायुक्त व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह दहा कर्मचाऱ्यांना विलगीकरणात जावे लागले. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यास चिंता नाही. पण पॉझिटिव्ह आल्यास अनेकांना क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याने दहशतीचे वातावरण आहे.सिव्हिल लाईन्स येथील महापालिका मुख्यालयातील पाचव्या माळ्यावरील कोंडवाडा विभागात चपराशी पॉझिटिव्ह आढळून आला. या माळ्यावर कोंडवाडा, आरोग्य (स्वच्छता) विभागाची कार्यालये आहेत. संबंधित कर्मचाऱ्याच्या भावाचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या एकाच कुटुंबातील १६ जण पॉझिटिव्ह निघाले. हा कर्मचारी गुरुवारी मुख्यालयात आला. यामुळे खबरदारी म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात पाठविण्यात आले. सर्वांचे स्वॅब घेण्यात आले आहे. अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्यांना येथेच थांबावे लागणार आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याने चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आढळून आलेल्या कर्मचाऱ्याचा अन्य विभागातही कामानिमित्त वावर होता. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे. मनपा मुख्यालात मागील दोन महिन्यापासून ड्युटीवर असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आहे.त्या कर्मचाऱ्यांची तपासणी करासतरंजीपुरा, मोमिनपुरा अशा कन्टेन्मेंट झोनमध्ये मागील काही दिवसांपासून सलग सर्व्हे करणाऱ्या कर्मचारी व शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या भागात शहराच्या विविध झोनमधील कर्मचारी व शिक्षक सर्व्हे करीत आहेत. हे काम त्याच भागातील झोनमधील कर्मचाºयांवर सोपविल्यास अधिक सोयीचे होईल, असे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने मनपात कोरोनाची दहशत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 8:30 PM
नागपूर शहरात शुक्रवारी एकाच दिवशी ४३ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. यात महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यामुळे उपायुक्त व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह दहा कर्मचाऱ्यांना विलगीकरणात जावे लागले. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यास चिंता नाही. पण पॉझिटिव्ह आल्यास अनेकांना क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याने दहशतीचे वातावरण आहे.
ठळक मुद्देउपायुक्त, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह दहा कर्मचारी विलगीकरणात