लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग बघता मंगल कार्यालय, लॉन तसेच गर्दीचे ठिकाण हे हॉटस्पॉट ठरु शकतात. याचा विचार करता प्रशानातर्फे धडक कारवाई केली जात आहे. तसेच वर्दळीच्या ठिकाणावर नजर ठेवली जाणार आहे. अचानक होणाऱ्या कारवाईमुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासन मंगल कार्यालये व लॉन यांनाच वेठीस का धरत आहेत, असा प्रश्न केला जात आहे. वास्तविक विवाह समारंभ व बाजारातील गर्दी यामुळे मोठ्या प्रमाणात पुन्हा कोविड संसर्ग होत आहे.
बुधवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी दहा झोन मधील ९० मंगल कार्यालय, लॉनची तपासणी केली. परंतु गर्दी आढळून न आल्याने कुणावर कारवाई केली नाही. मंगळवारी शोध पथकांच्या जवानांनी ७ सभागृहांवर कारवाई करुन ३७ हजार दंड वसूल केला. त्यामुळे बुुधवारी कोणत्याही सभागृहात लग्न समारंभ होताना दिसले नाही
आयुक्तांनी आता साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या वापर करुन आदेश निर्गमित केले आहे. या अंतर्गत गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी आकारण्यात येणारा दंड वाढविला आहे. सभागृह, मंगल कार्यालय, लॉन आदी कार्यक्रम स्थळी व्यवस्थापकाने कोविड नियमांचे उल्लंघन केले, मास्क, सॅनिटाइजरचा वापर केला नाही, गर्दी जमविल्यास पहिल्यावेळी १५ हजार दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा नियम मोडल्यास २५ हजार तर तिसऱ्यांदा नियम मोडल्यास ५० हजार दंड आकारला जाईल. आयोजकांवर आता १० हजार दंड आकारण्यात येईल. तसेच नियमांतर्गत २०० ऐवजी ५० लोकांना विवाह समारंभाला उपस्थित राहता येईल. नियम मोडल्यास कारवाईचे निर्देश आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे.
....
गर्दीच्या ठिकाणावर नजर
कोविड संदर्भात जारी दिशा-निर्देशांचे पालन होत नसल्याने पुन्हा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग बघता मंगल कार्यालय, लॉन तसेच गर्दीच्या ठिकाणामुळे कोविड संक्रमण वाढत आहे. परंतु ठोस आधार नसल्याने असा दावा करता येणार नाही. दोन-तीन दिवसात संसर्गाचा अभ्यास केल्यानंतर असा दावा करता येईल. गर्दीची ठिकाणी हॉटस्पॉट ठरु शकतात. हा धोका लक्षात घेता अशा ठिकाणांवर नजर ठेंवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
-राधाकृष्णन बी.मनपा आयुक्त
...
झोननिहाय तपासणी
झोन मंगल कार्यालय
लक्ष्मीनगर १२
धरमपेठ १२
हनुमाननगर ०६
धंतोली ०७
नेहरूनगर ०८
गांधीबाग ०८
सतरंजीपुरा ०७
लकडगंज १०
आसीनगर १०
मंगळवारी १०