काटोल / नरखेड / कळमेश्वर/ उमरेड/ कुही / रामटेक/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात बुधावारी ३८ रुग्णांचा मृत्यू झाला तर २,४३४ नव्या रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागात आतापर्यंत १५४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काटोल तालुक्यात ३९६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ४१ जणांना कोरानाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात काटोल शहरातील ३९ तर ग्रामीण भागातील २ रुग्णांचा समावेश आहे. नरखेड तालुक्यात ७९ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील २१ तर ग्रामीण भागातील ५८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १७०७ तर शहरातील ३०४ इतकी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात ५०, जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (२), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र (३) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावात तीन रुग्णांची नोंद झाली.
कळमेश्वर तालुक्यात २२१ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील ७८ तर ग्रामीण भागातील १४३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात मोहपा व तिष्ठी (बु) येथे सर्वाधिक १६ रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात ५३ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील ११ तर ग्रामीण भागातील ४२ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४६१९ झाली आहे. यातील २४२४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. सध्या २१९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उमरेड तालुक्यात ९७ कोरोना रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ६५ तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील मृत्यूसंख्या ८२ झाली आहे. यामध्ये शहरातील ५३ तर ग्रामीण भागातील २९ जणांचा समावेश आहे.
हिंगणा तालुक्यात १९३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरीत येथील २४, हिंगणा १०, इसासनी व नीलडोह येथील प्रत्येकी ४, सालई दाभा, गुमगाव, गौराळा व डिगडोह येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९,३७० झाली आहे. यातील ५,८९४ रुग्ण बरे झाले आहेत तर १८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कुही तालुक्यात विविध चाचणी केंद्रांवर २८८ नागरिकांची चाचणी करण्यात आली. यात ४९ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. यात मांढळ येथे २८, कुही व चिपडी येथे प्रत्येकी एक, वेलतूर (२), साळवा (४) व तितूर येथील १३ रुग्णांचा समावेश आहे.
२६२८ रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी २६२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ग्रामीण भागात आतापर्यंत ८७,९३० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ५९,०५४ रुग्ण उपाचारांती बरे झाले आहे. सध्या ग्रामीण भागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २७,८०३ इतकी आहे.