- सुमेध वाघमारे नागपूर : जखमी रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला २२० खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यास १० दिवसांत शासकीय रुग्णालयाला यश आले. २६ एप्रिलपासून हे हॉस्पिटल कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या सेवेत सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, येथे ६० खाटांच्या आयसीयूसोबतच स्वतंत्र क्ष-किरण विभाग, स्वतंत्र शस्त्रक्रिया गृह, स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र रक्तसाठा केंद्र असणार आहे. मध्य भारतातील सर्व सोयींनी सज्ज असलेले हे पहिले ‘कोविड हॉस्पिटल’ आहे.मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी केवळ १० दिवसांत ‘ट्रॉमा सेंटर’ रिकामे करून अद्ययावत सोयी उपलब्ध करून दिल्या.अधिष्ठाता डॉ. मित्रा म्हणाले, तळमजल्यावर ३० खाटांचा वॉर्ड आहे. येथील रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णाला पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरील ६५-६५ खाटांचे ‘हाय डिपेंडन्सी युनिट’मध्ये (एचडीयू) दाखल केले जाईल. दोन्ही मजल्यांवर ३०-३० खाटांचे आयसीयू आहेत. ४० व्हेंटिलेटरसह इतरही यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
CoronaVirus: मध्य भारतातील पहिले कोविड हॉस्पिटल नागपुरात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 5:11 AM