लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहरातील निवारागृहे तसेच अलगीकरण केंद्रांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा बुधवारी आढावा घेतला. सोशल डिस्टन्सिंग व सुरक्षेच्या नियमांचे पालन करत सेवांमध्ये आणखी सुधारणा करावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या यवतमाळ हाऊस या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्याचे युवक कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कोरोना संकटाच्या काळात मंत्र्यांनी राज्य व शहरातील एकूण स्थितीची चाचपणी करत आढावा घेतला.नितीन राऊत म्हणाले, क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये सुधारणा करण्यासंदभार्तील विशिष्ट सूचनांवर अंमलबजावणी केली जात आहे. नागपूर महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २३ हजारावर चाचण्या झाल्या आहेत आणि लाखो नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. नागपुरातील ५० टक्के पॉझिटिव्ह रुग्ण सतरंजीपुरा येथील ६८ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याचप्रमाणे इतर पॉझिटिव्ह रुग्ण विदेशातून व अन्य ठिकाणाहून भारतात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे राज्यामध्ये सध्यातरी सामाजिक संसगार्ची भीती नाही.राऊत पुढे म्हणाले, नागपूरमध्ये पाच ठिकाणी कोरोना निदान चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकी मेयोमध्ये दोन तर, मेडिकल, एम्स आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठात प्रत्येकी एक प्रयोगशाळा कार्यरत आहे. तसेच, येणाºया काळात गरज भासल्यास प्रयोगशाळांची संख्या वाढवली जाईल असे त्यांनी सांगितले.अनिल देशमुख म्हणाले, अमरावती रोड व लोणारा येथील शेल्टर होम्सना मंगळवारी भेट दिली. त्या ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांवर समाधानी आहे. रिपब्लिकन टीव्हीचे एडिटर-इन-चिफ व अँकर अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्धच्या पोलीस तक्रारीसंदर्भात बोलताना अनिल देशमुख यांनी, गोस्वामी यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे सांगितले.
CoronaVirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा सामूहिक प्रसार नाही : नितीन राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 1:22 AM
सोशल डिस्टन्सिंग व सुरक्षेच्या नियमांचे पालन करत सेवांमध्ये आणखी सुधारणा करावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या यवतमाळ हाऊस या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी ही माहिती दिली.
ठळक मुद्देबैठकीत घेतला नियोजन व व्यवस्थेचा आढावा