शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

CoronaVirus in Nagpur : कोविड प्रादुर्भावाचे १०० दिवस पूर्ण : ६५ पॉझिटिव्ह , एकूण रुग्ण संख्या १२७०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:35 PM

कोविड प्रादुर्भावाला शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले. ११ मार्चपासून सुरू झालेल्या या संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण गेल्या २० दिवसात आढळून आले. ७३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात शनिवारी नोंद झालेल्या ६५ रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या आता १२७०वर पोहचली आहे.

ठळक मुद्देगेल्या २० दिवसात ७३१ रुग्ण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड प्रादुर्भावाला शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले. ११ मार्चपासून सुरू झालेल्या या संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण गेल्या २० दिवसात आढळून आले. ७३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात शनिवारी नोंद झालेल्या ६५ रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या आता १२७०वर पोहचली आहे. रुग्णसंख्येचा हा वाढता आकडा आरोग्य यंत्रणेसाठी चिंता वाढविणारा असला तरी बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या समाधानकारक आहे. ८३८ रुग्ण बरे झाले आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत शुक्रवारी रात्री व शनिवारी असे मिळून ३१रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन होते. यातील बहुसंख्य रुग्ण हे नाईक तलाव-बांगलादेश, लष्करीबाग, काटोल चौक येथील आहेत. मेडिकलच्या प्रयोगशाळेतून पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण व्हीएनआयटी येथे क्वारंटाईन होते. मेयोच्या प्रयोगशाळेतून एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण मेयो येथेच भरती आहे. खासगी प्रयोगशाळेतन सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील तीन गणेशपेठ, एक रामदासपेठ, तर एक मोमीनपुरा येथील आहे. कळमेश्वर येथील एका रुग्णाचे नमुने मुंबईच्या खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले. नीरीच्या प्रयोगशाळेतून २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण पाचपावली क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल होते. आज एकूण ६५ रुग्णांची भर पडली.मार्च महिन्यात होते केवळ १६रुग्णमार्च महिन्यात कोरोनाचे केवळ १६ रुग्ण होते. एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या वाढून १३८ वर पोहचली तर मे महिन्यात रुग्णांची संख्या ५४० होती. परंतु २० जूनपर्यंत या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होऊन बाधितांची संख्या १२७० वर पोहचली. विशेष म्हणजे मार्च महिन्यात नोंद झालेल्या तीन रुग्णांची साखळी संपुष्टात आणण्यास आरोग्य यंत्रणेला यश आले होते. मात्र, नंतर सतरंजीपुरा, मोमीनपुरा, टिमकी, भानखेडा, नाईक तलाव-बांगलादेश, लष्करीबाग तर आता चंद्रमणीनगरसह विविध नव्या वसाहतीतून रुग्ण आढळून येत आहे.२० रुग्णांना डिस्चार्जएम्समधून ५ तर मेडिकलमधून १५ असे एकूण २० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. एम्समधून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये सर्व नाईक तलाव-बांगलादेश येथील आहेत. मेडिकलमधून सुटी झालेल्यांमध्येही सर्वाधिक रुग्ण याच वसाहतीतील आहेत. आतापर्यंत डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या ८३८ झाली आहे.दैनिक संशयित २४२दैनिक तपासणी नमुने ६६२दैनिक निगेटिव्ह नमुने ६०४नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १२७०नागपुरातील मृत्यू १८डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ८३८डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३७६५क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २६६८पीडित- १२७०-दुरुस्त-८३८-मृत्यू-१८

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर