शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus in Nagpur : गरजूंच्या मदतीसाठी वकिलांकडून १४ लाख गोळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:00 PM

कोरोनाला नष्ट करण्यासाठी देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीसाठी वकिलांच्या संघटनांनी गुरुवारी एकाच दिवशी १४ लाख रुपयावर रक्कम गोळा केली.

ठळक मुद्देएचसीबीए, डीबीए, डीआरटी बारचा पुढाकार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाला नष्ट करण्यासाठी देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीसाठी समाजातील सक्षम घटकांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. वकिलांच्या संघटनांनी त्यांना प्रतिसाद देत गुरुवारी एकाच दिवशी १४ लाख रुपयावर रक्कम गोळा केली. दानाचा ओघ सुरूच असल्यामुळे हा आकडा २० लाख रुपयापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए), डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन (डीबीए) व डीआरटी बार असोसिएशन यांनी वकिलांकडून ही मदत गोळा केली. कोरोनामुळे सर्व न्यायालयांत केवळ तातडीची प्रकरणे ऐकली जात असल्याने ९९ टक्के वकील न्यायालयात येत नाहीत. परिणामी, त्यांच्यापर्यंत मदतीचे आवाहन पोहचविण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेण्यात आली. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक व  ट्विटरवर मदतीचे आवाहन करणारी पोस्ट व्हायरल करण्यात आली. वकिलांनी त्याला प्रतिसाद देत संबंधित बँक खात्यांमध्ये आपापल्या शक्तीनुसार आर्थिक मदत जमा केली. अनेकांनी संघटनांकडे धनादेश नेऊन दिले. सायंकाळपर्यंत मदतीचा आकडा १४ लाख रुपयांवर पोहचला.डीबीएचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा यांनी चार लाख रुपयांवर मदत गोळा केल्याची माहिती दिली. आणखी दोन-तीन दिवस मदत स्वीकारू. त्यानंतर गोळा होणाऱ्या एकूण रकमेतील ४० टक्के रक्कम जिल्हाधिकारी यांना व ४० टक्के रक्कम पंतप्रधान मदतनिधीला दिली जाईल तर, २० टक्के रक्कमेतून गरजू वकिलांना मदत करू, अशी माहिती अ‍ॅड. सतुजा यांनी दिली.डीआरटी बारचे अध्यक्ष अ‍ॅड. अतुल पांडे यांनी पाच लाख रुपयावर रक्कम गोळा झाल्याची व ही संपूर्ण रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणार असल्याची माहिती दिली. ही संघटना आता मदत स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.एचसीबीएचे सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी गोळा झालेल्या मदतीची माहिती सध्याच्या परिस्थितीत देण्यास असमर्थता दर्शवली. तसेच, अंतिम मदत स्वीकारल्यानंतर रकमेचा आकडा जाहीर करू, असे सांगितले. परंतु जाणकारांनी या संघटनेकडे पाच लाखावर रुपये जमा झाले असावे, अशी शक्यता व्यक्त केली. कारण यापूर्वी संघटनेने विविध सामाजिक कार्यांसाठी १० लाखापेक्षा जास्तच रक्कम दान दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याadvocateवकिल