शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

CoronaVirus in nagpur : ३३५ बाधित, ५७६ बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 12:41 AM

Coronavirus, nagpur news कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली असताना दैनंदिन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी ३३५ बाधितांची नोंद झाली. तर, ५७६ रुग्ण बरे झाले आहेत. हा दर ९३.७० टक्क्यांवर पोहचला आहे.

ठळक मुद्दे७ मृत्यू : चाचण्यांची संख्या झाली कमी

लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली असताना दैनंदिन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी ३३५ बाधितांची नोंद झाली. तर, ५७६ रुग्ण बरे झाले आहेत. हा दर ९३.७० टक्क्यांवर पोहचला आहे. रुग्णांची एकूण संख्या १,२२,६४९ झाली असून मृतांची संख्या ३,९०७ वर गेली आहे.

नागपूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून ४ हजारांखाली कोरोना चाचण्या होत आहेत. आज २,२६७ आरटीपीसीआर तर १००५ रॅपिड अँटिजेन अशा एकूण ३,२७२ संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३०४, ग्रामीणमधील २८ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण आहेत. मृतांमध्ये आज शहरातील १, ग्रामीणमधील ३ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचे मृत्यू झाले. आतापर्यंत शहरात एकूण ९७,११६ रुग्ण व २,६२७ मृत्यू तर ग्रामीण भागात २४,७५७ रुग्ण व ६८६ मृत्यूची नोंद झाली आहे.

क्षमतेपेक्षा कमी चाचण्या

रोज ३५० ते ४५० दरम्यान बाधितांची भर पडत असताना चाचण्यांची संख्या वाढत नसल्याचे दिसून येत आहे. शासकीय प्रयोगशाळेच्या क्षमतेच्या तुलनेत कमी चाचण्या होत आहेत. मेडिकलमध्ये आज २२६, एम्समध्ये १३७, मेयोमध्ये १४९, माफसूमध्ये ६१, नीरीमध्ये शून्य, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत २३८ तर खासगी लॅबमध्ये १,४५६ चाचण्या झाल्या. जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी व त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पुण्याला नमुने पाठविण्यासाठी मेडिकलचा पुढाकार

कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आलेल्या विदेशातून नागपुरात परतलेल्या प्रवाशांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. पहिल्या प्रवाशाचे नमुने मनपाने मेयोमार्फत पाठविले. परंतु यात दोन दिवसांचा वेळ गेला. आता मेडिकलनेही यात पुढाकार घेतला आहे. चार प्रवाशांचे नमुने मेडिकलने पुण्याच्या ‘एनआयव्ही’कडे पाठविले आहेत. यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

दोन विमान प्रवासी पॉझिटिव्ह

नागपूर विमानतळावर रविवारी १०१ प्रवाशांची कोविड तपासणी करण्यात आली. यातील दोन प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. सात विमाने नागपुरात आली. यात दिल्ली येथून चार, अहमदाबाद येथून दोन व गोवा येथून एक विमान आले. ७६१ प्रवाशांपैकी १०१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

दैनिक संशयित : ३,२७२

बाधित रुग्ण : १,२२,६४९

बरे झालेले : १,१४,९२६

 उपचार घेत असलेले रुग्ण : ३,८१६

 मृत्यू : ३,९०७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर