लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ४२९ नवे संक्रमित रुग्ण आढळले आणि २१ रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच एकूण संक्रमितांची संख्या ९१,९८८ झाली आहे तर मृतांची संख्या ३००० वर गेली आहे.
आज आढळलेले नव्या संक्रमितांमध्ये २९१ शहरातून, १३० ग्रामीणचे आणि ८ रुग्ण जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत तर मृतांमध्ये ८ शहरातील, ५ ग्रामीण आणि ८ जिल्ह्याबाहेरील आहेत. दुसरीकडे ४५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात शहरातील २८४, ग्रामीणचे १७३ रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण ८२,८९६ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचा दर वाढून ९०.१२ टक्के झाला आहे. वर्तमानात जिल्ह्यात ६०९२ रुग्ण संक्रमित आहेत. यात शहरातील ३७९५ व ग्रामीणचे २२९७ रुग्ण आहेत.
गेल्या २४ तासात ६१६० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात शहरातील ४५६४ तर ग्रामीणचे १५७६ नमुन्यांची तपासणी झाली. ॲण्टीजन टेस्टमध्ये १८१, खासगी लॅबमध्ये १११ नमुने पॉझिटिव्ह आले. याशिवाय एम्सच्या लॅब मधून ९, मेडिकलच्या लॅबमधून ३९, मेयोच्या लॅबमधून ६८, नीरीच्या लॅबमधून २१ नमुने पॉझिटिव्ह आले.
ॲक्टिव्ह - ६०९२
कोरोनामुक्त - ८२,८९६
मृत - ३०००