शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

CoronaVirus in Nagpur : नागपुरात आणखी ९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:25 PM

उपराजधानीवर कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आज मंगळवारी पुन्हा ९ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह नागपुरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५६ झाली आहे.

ठळक मुद्देकोरोनाबाधितांची संख्या ५६ : आठ सतरंजीपुऱ्यातील तर एक इतवारीतील

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उपराजधानीवर कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आज मंगळवारी पुन्हा ९ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह नागपुरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५६ झाली आहे. विशेष म्हणजे, आज नोंद झालेले सर्वच रुग्ण संतरजीपुऱ्यातील आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या पुढाकारामुळे नागपुरात आणखी दोन प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. नमुने चाचणीची संख्या वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत आढळून आलेले २९ रुग्ण हे संस्थात्मक विलगीकरण कक्षातील आहेत. यामुळे रुग्ण वाढत असले तरी त्यांच्यापासून इतरांना होणारा संपर्क नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. आज नोंद झालेल्या नऊपैकी तीन रुग्णांमध्ये आठ व १८ वर्षांची मुलगी व ५८ वर्षीय पुरुष आहे. हे सर्व सतरंजीपुऱ्यातील बाधित मृताच्या नातेवाईकांच्या संपर्कातील आहेत. यांचे नमुने मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. तर उर्वरित सहा रुग्णांमध्ये ७०, २८ व १९ वर्षीय पुरुष तर ५० व दोन ४५ वर्षीय महिला आहेत. यातील एक रुग्ण इतवारी येथील आहे. तर उर्वरित पाच रुग्ण सतरंजीपुऱ्यातील आहेत. यांचे नमुने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) तपासले आहेत. यातील चौघांना मेयोत तर उर्वरित पाच रुग्णांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे.१८० नमुने निगेटिव्हमेयो, मेडिकल व एम्सने मिळून १८० नमुने तपासले. यात नऊ पॉझिटिव्ह नमुने वगळता १७१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. एकीकडे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना एवढ्या मोठ्या संख्येत नमुने निगेटिव्ह येत असल्याने, सोबतच कोरोनामुक्त होऊन रुग्ण रुग्णालयातून घरी जात असल्याने मोठा दिलासा आरोग्य यंत्रणेला मिळाला आहे.एकट्या वर्ध्यातील ४० नमुन्यांची तपासणीकाही दिवसांपूर्वी वर्ध्यात उत्तर प्रदेशात जात असलेल्या ट्रक पोलिसांनी पकडला होता. यात ४० वर लोक लपून बसले होते. या सर्व लोकांना वर्ध्यातच क्वारंटाईन करून ठेवण्यात आले. यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून रात्री तपासणी केली जाणार आहे. उद्या बुधवारी सकाळी अहवाल प्राप्त होईल. अलगीकरणातून १२८ संशयितांना पाठविले घरीआमदार निवास, वनामती, रविभवन, लोणारा व आजपासून सुरू झालेल्या सिम्बॉयसिस या संस्थात्मक अलगीकरण कक्षातून १२८ संशयितांना घरी पाठविण्यात आले. यांना अलगीकरण कक्षात १४ दिवस झाले असून अहवालही निगेटिव्ह आला आहे. सध्या या सहाही अलगीकरण कक्षात ४६७ संशयित आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित ५८दैनिक तपासणी नमुने १८०दैनिक निगेटिव्ह नमुने १७१नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५६नागपुरातील मृत्यू १डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ११डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ९७८क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित ४६७

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर