शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
3
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
4
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
5
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
6
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
7
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
8
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
9
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
10
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
11
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
12
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
13
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
14
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
15
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
16
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
18
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
19
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
20
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक

CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा एक पॉझिटिव्ह : कोरोनाबाधितांची संख्या ५९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:14 PM

कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. शुक्रवारी आणखी एक ३० वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आला.या रुग्णासह नागपुरात रुग्णांची संख्या ५९ झाली. यातील ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देसतरंजीपुऱ्यातील संपर्क; शांतिनगर येथील रहिवासी

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. शुक्रवारी आणखी एक ३० वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आला. शांतिनगर येथील रहिवासी असलेला हा रुग्ण सतरंजीपुऱ्यातील मृताचा नातेवाईक आहे. लोणारा अलगीकरण कक्षात हा रुग्ण १० एप्रिलपासून दाखल होता. या रुग्णासह नागपुरात रुग्णांची संख्या ५९ झाली. यातील ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.नागपुरातील पहिल्या कोरोना मृताकडून बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सतरंजीपुऱ्यातील ६८ वर्षीय पुरुष मृताकडून व त्यांच्या नातेवाईकाकडून आतापर्यंत सुमारे २२ वर संशयितांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा या मृताचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येते. १० एप्रिल रोजी या रुग्णाला लोणारा येथील अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्याचा पहिला नमुना निगेटिव्ह आला. पाचव्या दिवसानंतर या रुग्णाचा पुन्हा नमुना तपासणीसाठी मेयोला पाठविण्यात आला. यात तो पॉझिटिव्ह आला. या रुग्णावर पुढील उपचारासाठी अलगीकरण कक्षातून मेयोमध्ये पाठविले आहे.१९७ मधून १९२ नमुने निगेटिव्हअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) ८३ नमुने तपासले. यात यवतमाळ जिल्ह्यातील ५८ तर अमरावती जिल्ह्यातील २५ नमुन्यांचा समावेश होता. अमरावतीमधील चार नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित ७९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. मेयो प्रयोगशाळेने ६५ नमुने तपासले, यात ५२ नमुने आमदार निवास, उर्वरित १३ नमुन्यांमधून काही मेयो व भंडारा जिल्ह्यातील होते. यातील एक नमुना पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित ६४ नमुने निगेटिव्ह आले. मेडिकलने ४९ नमुने तपासले. या नमुन्यांचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. एकूण १९७ नमुन्यांमधून १९२ नमुने निगेटिव्ह आले आहेत.अलगीकरण कक्षात ४० संशयितांची भरवनामती, आमदार निवास, रविभवन, लोणारा व सिम्बायोसिस या पाच संस्थांत्मक अलगीकरणात आणखी ४० संशयितांची भर पडली. तर ५३ संशयितांचे दुसरे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. सध्या या पाचही ठिकाणी मिळून ५४५ संशयित भरती आहेत.

कोरोनाची आजची स्थिती

दैनिक संशयित ६१दैनिक तपासणी नमुने १९७दैनिक निगेटिव्ह नमुने १९२नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५९नागपुरातील मृत्यू १डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ११डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १०७१क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित ५४५

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर