शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

CoronaVirus in Nagpur : भिवापूर, मौदा व कुही अद्यापही कोरोनामुक्त : नागपुरात २१ रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 10:49 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पूर्वी शहरापुरातच मर्यादित असलेला हा आजार ग्रामीण भागातही पसरायला लागला आहे. तब्बल साडेतीन महिने कोरोनापासून दूर असलेल्या रामटेक तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. शनिवारी येथील एक युवक पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, भिवापूर, मौदा व कुही हे तीन तालुके अद्यापही कोरोनापासून दूर आहेत.

ठळक मुद्देरामटेकमध्येही कोरोनाचा शिरकाव : माधवनगर, सोमलवाडा व टेलिकॉमनगरात रुग्णाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पूर्वी शहरापुरातच मर्यादित असलेला हा आजार ग्रामीण भागातही पसरायला लागला आहे. तब्बल साडेतीन महिने कोरोनापासून दूर असलेल्या रामटेक तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. शनिवारी येथील एक युवक पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, भिवापूर, मौदा व कुही हे तीन तालुके अद्यापही कोरोनापासून दूर आहेत. जिल्ह्यात आज २१ रुग्णांची नोंद झाली असून रुग्णांची संख्या १४२३ वर पोहचली आहे. शहरातील माधवनगर, सोमलवाडा व टेलिकॉमनगरात पहिल्यांदाच कोरोना रुग्णाची नोंद झाली.रामटेक तालुक्यातील नगरधन येथील २९ वर्षीय युवक आपल्या पत्नीला सोडण्यासाठी २३ जून रोजी पुण्याहून आला. २६ जून रोजी पतीपत्नीचा नमुना तपासण्यात आला असता युवकाचा अहवाल आज पॉझिटिव्ह तर पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला. बाधित युवकाच्या घरी किराणा दुकान असून सासुरवाडीलादेखील किराणा दुकान आहे. यामुळे संपर्कात आलेल्या संशयितांना हुडकून काढण्यासाठी आरोग्य यंत्रणेला अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले. नागपूर ग्रामीणमध्ये आतापर्यंत १७९ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हिंगण्या तालुक्यात आढळून आले आहे.अमरावती येथील डॉक्टर पॉझिटिव्हखासगी प्रयोगशाळेतून ३, माफसू प्रयोगशाळेतून ४, एम्स प्रयोगशाळेतून १० तर मेयोच्या प्रयोगशाळेतून ४ असे २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेयोच्या प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये एक रामटेक, दोन सतरंजीपुरा तर एक मॉरिस कॉलेज वसतिगृहातील क्वारंटाईन सेंटरमधील रुग्ण आहे. इतर रुग्णामध्ये टेलिकॉम नगर, सोमलवाडा, माधवनगर, नाईक तलाव-बांगलादेश, हिंगणा, भारतनगर कळमना येथील रुग्ण आहे. अमरावती येथे रुग्णसेवा देत असलेला कनिष्ठ डॉक्टर नागपुरात पॉझिटिव्ह आला. या डॉक्टरवर मेडिकलमध्ये उपचार सरू आहेत.मुंबईवरून परतलेली महिला निघाली कोरोना पॉझिटिव्हबुटीबोरी येथील एका कंपनीत कार्यरत महिलेची कोविड-१९ टेस्ट पॉझिटिव्ह निघाली. ती २४ जून रोजी मुंबईवरून नागपूरला परत आली होती. लॉकडाऊनदरम्यान ही महिला पती व मुलासोबत मुंबईला गेली होती. ज्या कंपनीत ती काम करीत होती ती पुन्हा सुरू झाल्याने ती कामासाठी आली होती. २४ तारखेला ती मुलगा व पतीसोबत नागपूरला आली. तेव्हापासून ती टाकळघाट येथील निवासस्थानी होम क्वॉरंटाईन होती. दरम्यान नियमानुसार त्या तिघांचे स्वॅब टेस्टसाठी पाठवण्यात आले. रिपोर्ट आल्यावर महिला पॉझिटिव्ह निघाली. पती व मुलाचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला.२३ रुग्णांना डिस्चार्जमेयोमधून १० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात कामठी, वानाडोेंगरी, नाईक तलाव, लष्करीबाग, हंसापुरी व कृष्णा टॉकीज परिसर येथील रुग्ण आहेत. मेडिकलमधून १३ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात अमरनगर, वानाडोंगरी, रामेश्वरी, अमरावती येथील रुग्ण आहे. आतापर्यंत बरे होऊन घर परतलेल्या रुग्णांची संख्या १०६८ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर