शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

CoronaVirus in Nagpur : दिलासादायक! नागपुरात ४९,९४६ रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:14 AM

जिल्ह्यात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला असला तरी ७९.८८ टक्केरुग्ण बरे झाले आहेत. विशेष म्हणजे, शनिवारी १५५० बरे झालेल्या रुग्णांची भर पडल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४९,९४६ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देप्रमाण ८० टक्के : १,६२९ रुग्ण पॉझिटिव्ह, ५२ रुग्णांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला असला तरी ७९.८८ टक्केरुग्ण बरे झाले आहेत. विशेष म्हणजे, शनिवारी १५५० बरे झालेल्या रुग्णांची भर पडल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४९,९४६ वर पोहचली आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. कोरोना बरा होत असल्याचे दिसून येत आहे. मागील चार दिवसांनंतर पुन्हा रुग्णसंख्येत आज घट दिसून आली. १,६२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र ५२ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ६२,५३१ तर मृतांची संख्या १,९९२ झाली आहे.नागपूर जिल्ह्यात या आठवड्यातील १६ तारखेला आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे, २०५२ नव्या रुग्णांची भर पडली. मात्र त्यानंतर दोन दिवस १७०० तर आज १६००वर रुग्णांची नोंद झाली. रुग्णवाढीचा वेग कमी होत असून रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे. आतापर्यंत शहरात एकूण ४९,६८२, ग्रामीणमध्ये १२,४८८ तर जिल्ह्याबाहेरील ३६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील ४०,९३६, ग्रामीणमध्ये ९०१० रुग्ण बरे झाले आहेत. सध्याच्या स्थितीत मेयो, मेडिकल, एम्स, शासकीय कोविड सेंटर व खासगी हॉस्पिटलमध्ये १०,५९३ रुग्ण उपचाराखाली आहेत.६,८५४ चाचणीतून ५,२२५ रुग्ण निगेटिव्हआज रॅपिड अ‍ॅन्टिजन व आरटीपीसीआर या दोन्ही मिळून ६,८५४ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात ५,२२५ रुग्ण निगेटिव्ह आले. ३,५१५ अ‍ॅन्टिजन चाचणीतून ४०७ रुग्ण पॉझिटिव्ह तर ३,१०८ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये एम्समधील १११, मेडिकलमधील १७२, मेयोमधील २७२, नीरीमधील २३८ तर खासगी लॅबमधील ४२९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ३,९३,३५५ रुग्णांच्या चाचण्या झाल्या आहेत.

मेयोमध्ये १३९ तर मेडिकलमध्ये १८७ खाटाचजिल्हा माहिती कार्यालयाकडून उपलब्ध माहितीनुसार, शनिवारी मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये ४१३ तर मेयोमध्ये ४६१ रुग्ण भरती असल्याची नोंद होती. या दोन्ही रुग्णालयांत कोरोनाबाधितांसाठी प्रत्येकी ६०० खाटांचीच सोय आहे. यावरून मेडिकलमध्ये १८७ तर मेयोमध्ये १३९ खाटा रिकाम्या आहेत. ही दोन्ही रुग्णालये फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. सध्याच्या स्थितीत खासगी हॉस्पिटलसह कोविड केअर सेंटरमध्ये ५,३१४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर होम आयसोलेशनमध्ये ५,२७९ रुग्ण आहेत.संघ मुख्यालयातही कोरोनाशहरात कोरोनाचा प्रकोप प्रचंड वाढत आहे. कोरोना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयातही पोहोचला. मुख्यालयात राहत असलल्या ९ स्वयंसेवकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. संघाचे सहप्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी याची पुष्टी करीत सांगितले की, सर्वांच्या क्वारंटाईनची व्यवस्था इतर ठिकाणी करण्यात आली आहे. ज्या स्वयंसेवकांमध्ये लक्षणे आढळून आली आहेत त्यांना एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या स्वयंसेवकांमध्ये बहुतांश स्वयंसेवक ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत. या संघ मुख्यालयात संघप्रमुख डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी हेसुद्धा राहतात. परंतु ते दोघेही शहराबाहेर आहेत. भागवत सध्या भोपाळमध्ये आहेत. रविवारी ते नागपुरात येण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, पॉझिटिव्ह आढळून आलेल्या स्वयंसेवकांमध्ये काहींना कोरोनाची विशेष लक्षणे नाहीत. त्यांना संघ मुख्यालयाबाहेर सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. संघ मुख्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी दिल्लीतील कार्यालयातील दोन वरिष्ठ पदाधिकारीही पॉझिटिव्ह आले होते. आता ते दोघेही बरे होऊन पुन्हा कामाला लागले आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ६,८५४बाधित रुग्ण : ६२,५३१बरे झालेले : ४९,९४६उपचार घेत असलेले रुग्ण : १०,५९३मृत्यू : १,९९२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर