शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

CoronaVirus in Nagpur : कोरोनाच्या मृत्यूसंख्येतही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 10:22 PM

Corona death toll rises कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. सलग दुसऱ्या दिवशी, गुरुवारी रुग्णांची संख्या हजारावर गेली. १,११६ नव्या रुग्णांची नोंद झाली. धक्कदायक म्हणजे, मागील दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूंची संख्या १३ झाली.

ठळक मुद्दे१,११६ रुग्णांची भर, १३ मृत्यू : १,०२८ रुग्ण कोरोनामुक्त

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. सलग दुसऱ्या दिवशी, गुरुवारी रुग्णांची संख्या हजारावर गेली. १,११६ नव्या रुग्णांची नोंद झाली. धक्कदायक म्हणजे, मागील दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूंची संख्या १३ झाली. यामुळे आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. एकूण रुग्णसंख्या १,४६,८३१ झाली असून मृतांची संख्या ४,३१४ वर पोहचली. विशष म्हणजे १,०२८ रुग्ण बरे झाले.

नागपूर जिल्ह्यात तिसऱ्यांदा चाचण्यांची संख्या १० हजारांच्या घरात गेली. आज ५,९६१ आरटीपीसीआर तर ४,६५० रॅपिड अँटिजेन अशा एकूण १०,६११ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. शहरातील पाचपैकी माफसु येथील प्रयोगशाळा सोडल्यास उर्वरित चारही प्रयोगशाळेत क्षमतेनुसार तपासण्या केल्या जात आहेत. गुरुवारी सर्वाधिक चाचण्या मेडिकलच्या प्रयोगशाळेत झाल्या. १,४४२ तपासण्या करण्यात आल्या. यातून १९९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेयोच्या प्रयोगशाळेत १,२४२ चाचण्यांमधून १४६ पॉझिटिव्ह, एम्सच्या प्रयोगशाळेत ९९७ चाचण्यांमधून १२९, नीरीच्या प्रयोगशाळेत २७१ चाचण्यांमधून ६९, नागपूर विद्यापीठाच्या प्रशाळेत ५११ चाचण्यांमधून ८८ बाधित रुग्णांची नाेंद झाली. सर्व खासगी लॅब मिळून १,४९८ नमुने तपासण्यात आले. यात ४२६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अँटिजेनमधून ५९ तर आरटीपीसीआरमधून १०५७ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

शहरात ८२६, ग्रामीणमध्ये २८८ नवे रुग्ण

आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील ८२६, ग्रामीणमधील २८८ तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ९, ग्रामीणमधील २ तर जिल्ह्याबाहेरील २ मृत्यू आहेत. शहरातील एकूण रुग्णसंख्या १,१७,२०१ व मृत्यूंची संख्या २,७९२ झाली. ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या २८,६९६ तर मृत्यूंची संख्या ७७० झाली आहे.

१,३५,२५८ रुग्ण कोरोनामुक्त

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आज १०२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १,३५,२५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२.१२ टक्के आहे. सध्या ७,२५९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील ४,९०० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर २,३५९ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात भरती आहेत.

दैनिक चाचण्या : १०,६११

बाधित रुग्ण : १,४६,८३१

बरे झालेले : १,३५,२५८

 उपचार घेत असलेले रुग्ण : ७,२५९

 मृत्यू : ४,३१४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू