लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सतरंजीपुरा, मोमीनपुरा, शांतिनगर येथून सर्वाधिक रुग्ण आढळून येत असताना, बुधवारी टिमकी व कमाल चौक परिसरातील पहिल्यांदाच दोन नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले. लक्षणे असलेले हे दोन्ही रुग्ण क्वारंटाइन नसल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. या रुग्णांसह सहा रुग्णांची नोंद झाल्याने बुधवारी नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ९८ वर पोहचली. एकीकडे रुग्ण वाढत असताना दोन पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्याने काहीसा दिलासाही मिळाला आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘कोविड-१९’ ओपीडीमध्ये मंगळवारी रात्री ४० वर्षीय पुरुष व ३३ वर्षीय महिला स्वत:हून दाखल झाली. दोघांनाही ताप व खोकल्याची लक्षणे होती. संशयित म्हणून रुग्णालयात भरती करून नमुने तपासण्यासाठी पाठविले. बुधवारी सकाळी या दोघांचे नमुने पॉझिटिव्ह आले. हे दोन्ही रुग्ण क्वारंटाइन नव्हते. महिलेचे सतरंजीपुऱ्याशी तर पुरुषाचे मोमीनपुºयाशी संपर्क होता. यामुळे आता या दोन नव्या वस्त्यांमध्ये रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महानगरपालिकेने त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करणे सुरू केले आहे. प्रशासनाने या दोन्ही वसाहती सील केल्या आहेत. याशिवाय मेडिकलने मंगळवारी मध्यरात्री तपासलेल्या नमुन्यात सतरंजीपुरा रहिवासी ६६ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली. ती १७ एप्रिलपासून आमदार निवासात क्वारंटाइन होती. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) मंगळवारी रात्री तपासलेल्या नमुन्यात सतरंजीपुºयातील ८० वर्षीय वृद्ध, २५ वर्षीय पुरुष व भालदारपुºयातील पाच वर्षीय मुलाचे नमुने पॉझिटिव्ह आले. या सहाही रुग्णामधील तिघांना मेयोत तर उर्वरित तिघांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे.१९० मधून १७७ नमुने निगेटिव्हमेडिकलच्या प्रयोगशाळेत ९७ नमुने तपासण्यात आले. यातील ९५ नमुने निगेटिव्ह आले असून, उर्वरित दोन नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. मेयोच्या प्रयोगशाळेत केवळ ३५ नमुने तपासण्यात आले. यातील दोन पॉझिटिव्ह तर ३३ नमुने निगेटिव्ह आले. एम्सने ५८ नमुने तपासले. यात नागपुरातील १३, अमरावती जिल्ह्यातील ३७, यवतमाळ जिल्ह्यातील सात तर चंद्रपूर जिल्ह्यातील एका नमुन्याचा समावेश होता. यातील नागपुरातील १३, अमरावतीमधील ३१, यवतमाळमधील सहा तर चंद्रपूरमधील एक असे एकूण ४९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. एकूणच तपासलेल्या १९० नमुन्यांमधून १७७ नमुने निगेटिव्ह आले.
CoronaVirus in Nagpur : नागपुरातील टिमकी, कमाल चौक परिसरात कोरोनाबाधित रुग्ण : सहा वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:08 PM
सतरंजीपुरा, मोमीनपुरा, शांतिनगर येथून सर्वाधिक रुग्ण आढळून येत असताना, बुधवारी टिमकी व कमाल चौक परिसरातील पहिल्यांदाच दोन नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले. लक्षणे असलेले हे दोन्ही रुग्ण क्वारंटाइन नसल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. या रुग्णांसह सहा रुग्णांची नोंद झाल्याने बुधवारी नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ९८ वर पोहचली.
ठळक मुद्देकोरोनाबाधितांची संख्या ९८