लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याने साऱ्या देशाचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दिल्ली येथूनही नागपुरात आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत आमदार निवास, वनामती व रविभवनात ११७ प्रवाशांना दाखल करण्यात आले. सध्याच्या स्थिती आमदार निवास व वनामती प्रवाशांनी फुल्ल झाले आहे. आज दिवसभरात मेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले १०९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. यात तबलिग जमातमधील व्यक्तींचे नमुने नसल्याची माहिती आहे. नागपुरात आतापर्यंत १६ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील चार रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित १२ मधून नऊ रुग्ण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) तर तीन रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मेयोमध्ये सध्या ३८ तर मेडिकलमध्ये १९ संशयित रुग्ण भरती आहेत. दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेले तीन रुग्ण नागपुरात पॉझिटिव्ह आले आहेत. या शिवाय, निजामुद्दीन मरकजमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने येथून नागपुरात आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आज दिवसभरात दिल्ली आणि मरकजमधून आलेल्या एकूण ११७ संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. सध्या आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात ३२८, वनामतीच्या विलगीकरण कक्षात ८४ तर रविभवनाच्या विलगीकरण कक्षात ३३ संशयितांना ठेवण्यात आले आहे. मेयो, मेडिकलची चमू या विलगीकरण कक्षात जाऊन त्यांचे नमुने घेत आहे. उद्या शुक्रवारी यातील काही नमुन्यांचा अहवाल येण्याची शक्यता आहे.तो रुग्ण निगेटिव्हमध्य प्रदेश सिवनी येथील ५५ वर्षीय कोरोना संशयित रुग्णाला मंगळवारी सायंकाळी नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी घेण्यात आलेल्या नमुन्याचा आज गुरुवारी निगेटिव्ह अहवाल आला. यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
CoronaVirus in Nagpur : दिल्ली प्रवाशांनी नागपुरातील विलगीकरण कक्ष फुल्ल : ११७ संशयितांची पडली भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 10:53 PM
दिल्ली येथूनही नागपुरात आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत आमदार निवास, वनामती व रविभवनात ११७ प्रवाशांना दाखल करण्यात आले. सध्याच्या स्थिती आमदार निवास व वनामती प्रवाशांनी फुल्ल झाले आहे.
ठळक मुद्दे१०९ संशयितांचे नमुने निगेटिव्ह