लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘भर दे झोली मेरी जाँ मोहम्मद, लौट कर ना जाऊंगा खाली’ असे मागणे बाशिंदा खुदाकडे मागतो आणि अल्ला आपले मागणे पूर्ण करेल, अशी तमन्ना व्यक्त करतो. तशीच फिर्याद आज मोठ्या ताजबागेत मौलानाने मागितली. मात्र, येथे खुदा नव्हे तर खुदाचे बाशिंदे होते आणि त्यांना सरकारच्या दिशानिर्देशाला सहकार्य करण्याची कळकळीची विनंती करावी लागत होती.घर से बाहर ना निकले, बस्ती का नाम रौशन करे... आज ये मॅसेज जा रहा है, ये गलत है... ताजाबाग शरीफ में बहुत शांती है, और वो बनाये रखे... मेहेरबानी करके ज्यादा लोक एकत्रित ना हो... प्रशासन को मदद करे और खुद को भी बचाये.. अपने आप को संभालिये... भाईसाब बेकारी में मत घुमिये, अपने अपने घर पर रहिये.. बिनावजह घर से बाहर ना निकले.. अशा दरखास्त, गुजारिश करत मौलानांना ताजबाग शरिफमध्ये रस्त्यावर उतरावे लागले. कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि त्याची धास्ती नागरिकांकडूनही घेतली जात आहे. मात्र, शहरातील ताजाबागमध्ये नागरिक पोलीसांनाही जुमानत नसल्याच्या गोष्टी वारंवार बाहेर पडत होत्या. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाला कठोर पाऊले उचलावी लागत आहेत. या कठोर पावलांचा परिणाम सामाजिक सौहार्द्र बिघडण्यात होऊ नये म्हणून प्रशासनाकडूनच संबंधित धर्मप्रमुखांना आपापल्या समूदायांमध्ये समाजजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचा आवाहनाचा परिणाम म्हणून ताजबागेत खुद्द मौलानांना रस्त्यावर उतरावे लागले. मौलांना आपल्या चारचाकी गाडीमध्ये बसून लाऊडस्पिकरने कोरोना विषाणूच्या प्रकोपाची माहितीदेण्यासोबतच सोशल डिस्टन्सिंग जपण्याचे आवाहन करत होते. देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलीसांना आपला दंडूका बाहेर काढावा लागला आहे आणि त्याची परिणिती पोलीस व नागरिक यांच्या संघर्षात झाल्याचे काही ठिकाणी दिसून आले. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने, पोलीसांना ही सख्ती दाखवावी लागत आहे आणि त्याच सख्तीच्या अनुषंगाने आज ताजाबाग शरिफ येथे मौलानांना रस्त्यावर उतरून नागरिकांना समज द्यावी लागली, हे विशेष.
CoronaVirus in Nagpur : घर से बाहर ना निकले, बस्ती का नाम रौशन करे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 10:42 PM
‘भर दे झोली मेरी जाँ मोहम्मद, लौट कर ना जाऊंगा खाली’ असे मागणे बाशिंदा खुदाकडे मागतो आणि अल्ला आपले मागणे पूर्ण करेल, अशी तमन्ना व्यक्त करतो. तशीच फिर्याद आज मोठ्या ताजबागेत मौलानाने मागितली.
ठळक मुद्देनागपुरातील ताजबागेत मौलानाची नागरिकांना ‘बिनती’