लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’साठी लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे कामगार, गरिबांची परवड होत आहे. त्यांच्या मदतीसाठी सरकार, विविध सामाजिक संस्थांप्रमाणेच भाजपतर्फेदेखील पुढाकार घेण्यात आला आहे. सोमवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली.या आढावा बैठकीला खासदार विकास महात्मे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, महापौर संदीप जोशी, भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित होते. गडकरी यांनी मदतकार्याचे स्वरूप व त्याची व्याप्ती याचा आढावा घेतला. भाजपने तळागाळात जाऊन नागरिकांची मदत केली पाहिजे तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी जनजागृती केली पाहिजे, अशी सूचना गडकरी यांनी यावेळी केली.
CoronaVirus in Nagpur : गडकरींनी घेतला मदतकार्याचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 9:27 PM