लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्ली येथील निजामुद्दीनच्या मरकज येथील घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री अचानक नागपूरच्या जामा मशिदीतील इमाम कारी खालीक यांच्याशी फोनवर संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इमामांना कोरोनाच्या या लढाईत मदतीचे आवाहन केले. तसेच त्यांना समजावले की, तपासणी न केल्यास काय धोका होऊ शकतो. जे लोक पॉझिटिव्ह आढळून येतील, त्यांच्यावर उपचार शक्य आहे. उपचार झाला नाही तर त्यांच्या स्वत:सह इतरांनाही संसर्गाचा धोका आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी इमामांनी समाजातील लोकांशी चर्चा करावी आणि त्यांना तपासणी करून घेण्यास पुढे यावे, अशी विनंतीही केली.विशेष म्हणजे दिल्ली निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमात सहभागी होऊन ७ लोक नागपूरला परतले आहेत. एका संशयित रुग्णास मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल बुधवारी निगेटिव्ह आला आहे. यादरम्यान नागपूर मरकजच्या ५४ लोकांना स्थानिक प्रशासनाने आमदार निवासातील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले आहे.समाजाशी करणार चर्चालोकमतशी चर्चा करताना इमाम साहेब यांनी सांगितले की, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचनेवर निश्चितच अंमल करतील. समाजातील लोकांशी ते चर्चा करतील. मुख्यमंत्र्यांनी चांगल्या कामासाठी मदत मागितली आहे. तेव्हा आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करू.
CoronaVirus in Nagpur : मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतोय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 8:13 PM
दिल्ली येथील निजामुद्दीनच्या मरकज येथील घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री अचानक नागपूरच्या जामा मशिदीतील इमाम कारी खालीक यांच्याशी फोनवर संवाद साधला.
ठळक मुद्देनागपूरच्या जामा मशिदीतील इमामांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद कोरोनाबाबत शंका असलेल्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन केले