शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

CoronaVirus in Nagpur : बरे होणाऱ्या रुग्णांचा दर नागपूरचा सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:35 PM

राज्यातील ज्या शहरात एक हजारापेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे, त्या शहराच्या तुलनेत नागपुरात रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ७३.३५ टक्क्यांवर पोहचली आहे.

ठळक मुद्दे१०१६ रुग्ण कोरोनामुक्त : ८ रुग्ण पॉझिटिव्ह : रुग्णांची संख्या १३८५

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यातील ज्या शहरात एक हजारापेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे, त्या शहराच्या तुलनेत नागपुरात रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ७३.३५ टक्क्यांवर पोहचली आहे. विदर्भात पहिल्यांदाच हजारावर रुग्ण कोरोनामुक्त होणारे नागपूर हे पहिले ठरले आहे. विशेष म्हणजे, बुधवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५१ झाली असताना, गुरुवारी केवळ आठ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या १३८५ झाली. शिवाय, आज ५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे होणाºया रुग्णांची संख्या १०१६ वर पोहचली आहे.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील दोन रुग्ण हे मिलिटरी हॉस्पिटल कामठी येथील आहेत. दोन आठवड्यापूर्वी याच हॉस्पिटलमधून दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेली एक महिला व तिचे पती पॉझिटिव्ह आले होते. आता पुन्हा दोन रुग्णांचे निदान झाले आहे. याशिवाय, पारडी येथील दोन व मिनी मातानगर येथल एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. खासगी लॅबमधून अमरावती येथील निवासी डॉक्टर पॉझटिव्ह आला आहे. या रुग्णाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मेडिकलच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेला एक रुग्ण नरेंद्रनगर येथील आहे. खासगी प्रयोगशाळेतून आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. त्याची माहिती मिळू शकलेली नाही.जून महिन्यात ७००रुग्ण झाले बरेमार्च महिन्यात केवळ एक रुग्ण कोरोनामुक्त झाला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात ४३ रुग्णांना सुटी देण्यात आली होती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘आयसीएमआर’चे नवे डिस्चार्ज धोरण लागू करण्यात आले. यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांना १० दिवसातच सुटी होऊ लागली. या महिन्यात ३०० रुग्णांना सुटी देण्यात आली, तर जून महिन्यात तब्बल ७०० रुग्णांना सुटी मिळाली.५१ रुग्णांना डिस्चार्जमेडिकल, मेयो व एम्स मिळून ५१ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात मेडिकलमधील २३ रुग्ण आहेत. यातील बहुसंख्य रुग्ण हे नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. याशिवाय, तांडापेठ, नरसाळा, हुडकेश्वर रोड, आर्यननगर, धरमपेठ, अमरावती, भगवाननगर, हिंगणा, विश्वकर्मानगर व अमरनगर येथील आहेत. मेयो येथून १३ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात हिंगणा, नाईक तलाव-बांगलादेश, मंगळवारी, चंद्रमणीनगर व भोईपुरा येथील आहेत. एम्समधून पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. यात वैशालीनगर हिंगणा, श्रमिकनगर एमआयडीसी, साईनगर हिंगणा, तीन नल चौक येथील रुग्ण आहेत.नागपुरातील कोरोना स्थितीसंशयित : २,५९१अहवाल प्राप्त : २३,०५३बाधित रुग्ण : १३८५घरी सोडलेले : १०१६मृत्यू : २१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर