शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

Coronavirus in Nagpur; कोरोनाच्या तिसऱ्या व चौथ्या लाटेसाठीदेखील तयारी हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 6:35 PM

Coronavirus in Nagpur सध्या कोरोनाबाधितांची संख्या काहीशी कमी होत असली म्हणून निश्चिंत होणे योग्य होणार नाही. पुढे काय होईल याबाबत सांगितले जाऊ शकत नाही. तिसरी व चौथी लाटदेखील येऊ शकते व त्यासाठी आपण तयार असले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देफिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - कोरोनाचे संकट मोठे असून त्याचा सर्व सामना करत आहेत. सध्या कोरोनाबाधितांची संख्या काहीशी कमी होत असली म्हणून निश्चिंत होणे योग्य होणार नाही. पुढे काय होईल याबाबत सांगितले जाऊ शकत नाही. तिसरी व चौथी लाटदेखील येऊ शकते व त्यासाठी आपण तयार असले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्पाईस हेल्थच्या फिरत्या आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळेचे गुरुवारी लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, स्पाईस हेल्थचे संचालक अजय सिंग हे प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूर शहरातील कोरोनाबाधितांसाठी २०० व्हेंटिलेटर्स आले आहेत. शिवाय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता लवकरच हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरदेखील येणार असून, या सर्वांचे वितरण विदर्भातील ग्रामीण भागात होणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून चाचणी अहवाल मिळण्याचा कालावधी १२ तास करण्याचासुद्धा प्रयत्न आहे. संबंधित अहवाल मोबाईलवरच मिळणार असल्याने प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. नागपूर शहरासोबतच पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील नमुन्यांची चाचणीसुद्धा येथील प्रयोगशाळेत होणार आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

सीएसआरमधून मेयो, मेडिकलला १५ कोटी रुपये

गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूर विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत गडकरी यांनी आढावा बैठक घेतली. सीएसआरअंतर्गत वेकोलितर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयोला १५ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. सोबतच इतर पाच रुग्णालयांनादेखील सीएसआरमधून हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याच्या प्रकल्पासाठी निधी देण्यात येईल, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

क्रायोजेनिक कंटेनर खरेदी करणार

आतापर्यंत विदर्भातील सरकारी इस्पितळांना दीडशे तर मनपाच्या दवाखान्यांना २५ व्हेंटिलेटर्स दिले आहेत. ऑक्सिजन वाहतुकीसाठी विदेशातून क्रायोजेनिक कंटेनर खरेदी करण्याचे प्रस्तावित असून तीन हजार सिलेंडर खरेदी करून ते विदर्भात वितरित करण्यात येतील, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

सफाई कर्मचाऱ्यांचे मौलिक योगदान

या संकटकाळात मेडिकलचे कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी तसेच अधिकारी वर्ग यांचे मौलिक योगदान राहिले आहे. ते जीव धोक्यात टाकून काम करत असून त्यांना जनतेने पूर्ण सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन गडकरी यांनी केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNitin Gadkariनितीन गडकरी