शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

CoronaVirus in Nagpur : आता सतरंजीपुरातील शांतिनगरही सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 1:07 AM

कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने मनपाच्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणारे प्रभाग क्रमांक २१ शांतिनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र (सील) म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमनपा आयुक्तांचे आदेश : प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने मनपाच्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणारे प्रभाग क्रमांक २१ शांतिनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र (सील) म्हणून घोषित करण्यात आले आहे. महापालिका उपायुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात शनिवारी आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती वाढली आहे.कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच शहरातील नागरिकांचे हित व सुरक्षेच्यासाठी संबंधित रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून सील केला जात आहे. आतापर्यंत सतरंजीपुरा झोनअंतर्गत सतरंजीपुरा, मोमीनपुरा, तकिया, मंगळवारी झोन अंतर्गत येणारे गिट्टीखदान परिसरातील प्रभाग क्रमांक १० व १२ हे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आता शांतिनगरही सील करण्यात आले आहे. मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे प्रभाग क्रमांक २१ शांतिनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यातील शांतिनगर घाट चौक, मुदलीयार चौक, शांतिनगर युनिव्हर्सल चौक सील करण्यात आले आहेत. उपरोक्त भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून सदर भागाच्या सीमा (हद्द) वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. या भागातील नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व परिसराच्या बाहेरच्या व्यक्तीला येण्यास बंदी घालण्यात आली आहे.अत्यावश्यक सेवा सुरू राहणारशांतिनगरचा परिसर सील करण्यात आला असला तरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहील. शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर्स, नर्स, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथालॉजिस्ट, रुग्णवाहिका इत्यादी, जीवनावश्यक वस्तूंचा सेवा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती (पोलीस विभागामार्फत पास प्राप्त धारक) यांच्यासाठी आदेश लागू होणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर