लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेतर्फे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ३३३ चमूंच्या माध्यमातून माहिती संकलित केली जात आहे. १४ एप्रिल पर्यंत शहरातील ५ लाख ५८ हजार ९४ घरांंचा सर्वे करण्यात आला असून २३ लाख ८५ हजार ६८९ नागरिकांची माहिती संकलित केली आहे.मनपाच्या दहाही झोनमध्ये १०० पथके आहेत. दररोज २८ हजार ३९३ घरापर्यंत पथक पोहचत आहे. काही भागातील घरांना रॅपिड रिस्पॉन्स टीमने भेट दिली आहे. लक्ष्मीनगर झोनमध्ये ३ लाख ८ हजार ४१५ लोकांचा सर्वे करण्यात आला आहे. धरमपेठ झोनमधील १ लाख ९२ हजार ७८२, हनुमाननगर झोनमधील २ लाख ९३ हजार ७७०,धंतोली झोनमधील १ लाख ९१ हजार ८१२, नेहरूनगर झोन ३ लाख १६ हजार ७२४, गांधीबाग झोनमधील १ लाख ५७ हजार ५८३, सतरंजीपुरा झोनमधील १ लाख ९२ हजार ९९३, लकडगंज झोनमधील २ लाख ८१ हजार ८२१, आसीनगर २ लाख १९ हजार ९०७ तर मंगळवारी झोनमधील २ लाख २९ हजार ८८२ नागरिकांचा सर्वे करण्यात आला आहे. नागपुरात काही भागात कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा झोनमधील सर्वेच्या कामाला प्राधान्य देण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.झोननिहाय करण्यात आलेला सर्वे झोनलक्ष्मीनगर ३०८४१५धरमपेठ १९२७८२हनुमाननगर २९३७७०धंतोली १९१८१२नेहरूनगर ३१६७२४गांधीबाग १५७५८३सतरंजीपुरा १९२९९३लकडगंज २८१८२१आसीनगर २१९९०७मंगळवारी २२९८८२एकूण २३८५६८९
CoronaVirus in Nagpur : नागपुरात २३.८५ लाख लोकांचा सर्वे : साडेपाच लाख घरापर्यंत पोहचले पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 8:56 PM
कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेतर्फे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ३३३ चमूंच्या माध्यमातून माहिती संकलित केली जात आहे. १४ एप्रिल पर्यंत शहरातील ५ लाख ५८ हजार ९४ घरांंचा सर्वे करण्यात आला असून २३ लाख ८५ हजार ६८९ नागरिकांची माहिती संकलित केली आहे.
ठळक मुद्दे३३३ चमूंच्या माध्यमातून माहिती संकलन