लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या ६५७ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील सहा दिवसात शोध पथकांनी २,४४२ नागरिकांविरुध्द कारवाई करून ४लाख ८८ हजार ४०० रुपये दंड वसूल केला आहे.नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मृतांची संख्यासुद्धा झपाट्याने वाढत चालली आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचना मनपाद्वारे वारंवार केली जात आहे. परंतु सूचनांचे पालन न केल्यामुळे शोध पथकाचे जवानांनी कारवाई करुन दंड वसूल केला.लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ४६, धरमपेठ झोन अंतर्गत २०१, हनुमाननगर झोन अंतर्गत ६१, धंतोली झोन अंतर्गत ७३, नेहरुनगर झोन अंतर्गत ३६, गांधीबाग झोन अंतर्गत ४१, सतरंजीपुरा झोन अंतर्गत १८, लकडगंज झोन अंतर्गत ३५, आशीनगर झोन अंतर्गत ३७, मंगळवारी झोन अंतर्गत १०१ आणि मनपा मुख्यालयात ८ जणांविरुद्ध शोध पथकाचे प्रमुख वीरसिंग तांबे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली.झोननिहाय कारवाईलक्ष्मीनगर - ४६धरमपेठ - २०१हनुमाननगर - ६१धंतोली -७३नेहरूनगर - ३६गांधीबाग -४१सतरंजीपुरा - १८लकडगंज - ३५आशीनगर - ३७मंगळवारी - १०१मनपा मुख्यालय - ८
मनपा : मास्क न लावणाऱ्या ६५७ नागरिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 9:16 PM