शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

नागपूर जिल्हा परिषदेच्या बैठकीला भट सभागृह देण्यास मनपाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 11:02 PM

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेकरता भट सभागृह देण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिल्याची माहिती आहे. महानगरपालिकेने सभागृह देण्यास नकार दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने देशपांडे सभागृहात सभा घेण्याची तयारी सुरू केल्याची सूत्रांकडून समजते.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेकरता भट सभागृह देण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिल्याची माहिती आहे. महानगरपालिकेने सभागृह देण्यास नकार दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने देशपांडे सभागृहात सभा घेण्याची तयारी सुरू केल्याची सूत्रांकडून समजते.जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर एकही सभा घेता आली नाही. अर्थसंकल्पाचीही सभा होऊ शकली नाही. अर्थसंकल्पही तत्कालीन सीईओंनी मंजूर केला. परंतु अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीस सर्वसाधारण सभेची परवानगी आवश्यक आहे. मात्र कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यापासून सभाच घेता नाही. यामुळे विकास कामांना खीळ बसली. जिल्हा परिषदेकडून सभेकरता मागण्यात आलेली पहिली विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली, परंतु दुसऱ्यांदा परवानगी देण्यात आली. याकरिता जिल्ह्यातील एका काँग्रेसच्या बड्या नेत्याने मोठे प्रयत्न केले. महानगरपालिकेच्या मालकीच्या भट सभागृहात ही सभा घेण्याचा मानस जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. भट सभागृह मिळण्याकरता अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्रही दिले होते. याकरिता आवश्यक रक्कम भरण्याची तयारी दर्शविली होती. महानगरपालिकने भट सभागृह देण्यास आता नकार दर्शविला आहे. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी तशी मौखिक माहितीही जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका