लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात बेड मिळत नाही. ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. शहरातील परिस्थिती गंभीर आहे. दिलासादायक म्हणजे मनपा रुग्णालय व डेडिकेट कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून १,००६ बेड करणार आहेत. यातील इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलशन, आयुष, पाचपावली व के.टी.नगर आदी ठिकाणी ऑक्सिजनसह ३४० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
इंदिरा गांधी रुग्णालय येथे ११०, आयसोलशन ३२, आयुष ४०, केटीनगर रुग्णालयात ८० तर पाचपावली डेडिकेट कोविड केअर सेंटर येथे ७८ बेडची व्यवस्था केली आहे. श्री आयुर्वेद महाविद्यालय येथे १०० तर पक्वासा रुग्णालय येथे ११० बेड सुविधा केली जात आहे. श्री आयुर्वेद येथे १००, के.डी.के. कॉलेज येथे १५०, सुप्रीम टॉवर येथे ५६, सिम्बॉयसिस येथे १५० तर श्री अग्रसेन भवन येथे १०० बेडची व्यवस्था केली जात आहे.
...
पाचपावली व सिम्बॉयसिस येथे ऑक्सिजन सुविधा
पाचपावली रुग्णालयात येथे ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. ही यंत्रणा एक-दोन दिवसांत कार्यान्वित होणार आहे. सिम्बॉयसिस येथे ऑक्सिजन लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.
...
उपलब्ध व प्रस्तावित बेड
इंदिरा गांधी रुग्णालय -११०
आयसोलेशन -३२
आयुष -४०
पाचपावली(डीसीएससी)-७८
के.टी.नगर -८०
पक्वासा-११०
श्री आयुर्वेद -१००
के.डी.के.-१५०
सुप्रीम टॉवर -५६
सिम्बॉयसिस -१५०
श्री अग्रसेन भवन -१००
एकूण -१,००६