शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मनपाची अभय योजना : थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 8:15 PM

NMC Abhay Yojna , nagpur news महापालिकेतर्फे थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणारी शास्ती (दंड) माफ होणार आहे.

ठळक मुद्दे१५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी २०२१ दरम्यान कर भरणाऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेतर्फे थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणारी शास्ती (दंड) माफ होणार आहे. मालमत्ता कराच्या ३१ मार्च २०२० पर्यंतच्या थकीत करावर व चालू वर्षातील कर ३१ डिसेंबरपर्यंत भरणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी मनपाने अभय योजना -२०२० ही १५ डिसेंबरपासून लागू केली आहे. या योजनेंतर्गत संबंधित काळातील मालमत्ता करावरील शास्ती काही प्रमाणात माफ होणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी यासंबंधीचे आदेश जारी केले आहे. यामुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आयुक्तास प्राप्त अधिकारान्वये ही योजना लागू करण्यात आली आहे. अभय योजनेचा कालावधी १५ डिसेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ असा राहील. या योजनेंतर्गत ३१ मार्च २०२० पर्यंत थकीत कर असणाऱ्या तसेच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत भरल्यास चालू आर्थिक वर्षाकरिता थकबाकीदार होणाऱ्या करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्याने आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याने थकीत मालमत्ता कर रकमेवरील शास्ती माफ करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व करदात्यांनी केली होती.

अशी असेल शास्तीवरील सवलत?

अभय योजना-२०२० लागू असलेल्या काळात करदात्यांकडून नागपूर महानगरपालिकेस घेणे असलेली मूळ रक्कम १०० टक्के भरल्यास थकीत रकमेवर प्रतिमाह दोन टक्के आकारण्यात आलेला दंड आणि नियम ५० अन्वये जप्ती अधिपत्र बजावणी शुल्क अथवा वसुलीचा खर्च नियमानुसार काही प्रमाणात माफ करण्यात येईल.

- ३१ मार्च २०२० पर्यंत थकीत असलेल्या मालमत्ता करासह चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता करसुद्धा अदा केल्यास शास्ती रकमेवर ८० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही रक्कम १५ डिसेंबर २०२० ते १४ जानेवारी २०२१ च्या रात्री ८ वाजतापर्यंत अदा करणाऱ्यांना सवलत मिळेल.

- १५ जानेवारी २०२१ ते १४ फेब्रुवारी २०२१ च्या रात्री ८ वाजतापर्यंत या कालावधीत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच्या थकीत मालमत्ता कराची रक्कम महापालिका निधीत जमा केल्यास शास्तीवर ५० टक्के सवलत मिळेल.

- योजनेअंतर्गत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण ८ कराधान नियम ४१ खालील शास्ती किंवा नियम ५० खालील जप्ती अधिपत्र बजावणी शुल्क किंवा वसुली खर्च पूर्णत: किंवा अंशत: वा जाहिरात शुल्क वगळून माफ करण्यात येईल.

ठराविक कालावधीतच लाभ मिळणार

अभय योजना ही ठराविक कालावधीत जमा केलेल्या रकमांनाच लागू राहील. योजना कालावधीच्या आधी अथवा नंतर भरणा होणाऱ्या रकमांना योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या कालावधीसाठी सवलतीचा लाभ घ्यावयाचा आहे त्या कालावधीतील कोणतेही प्रलंबित असलेले अपील, पुनरीक्षणासाठी आलेले आवेदन, संदर्भ आवेदन, न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका प्रलंबित असल्यास ते विना अट मागे घ्यावे लागेल. अभय योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अपील, पुनरीक्षण आवेदन, संदर्भ आवेदन, न्यायालयात दावा किंवा रिट याचिका दाखल केल्यास अथवा सदर योजनेतील लाभधारक भविष्यात थकबाकीदार आढळल्यास अभय योजनेअंतर्गत संबंधित कालावधीसाठी दिलेल्या सवलती मनपातर्फे काढून घेण्यात येईल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर