लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने मनपाच्या एनडीएस पथकांनी बुधवारी ११ प्रतिष्ठाने, कार्यालये व दुकानांवर कारवाई करून ६३ हजाराचा दंड वसूल केला. पथकांनी दिवसभरात ८२ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.
लक्ष्मीनगर झोनमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी केली. धरमपेठ झोनमध्ये पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून १३ हजार रुपये दंड केला. हनुमाननगरमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. धंतोली झोनमध्ये १८ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार, नेहरूनगरच्या पथकाने पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार. गांधीबाग झोनमध्ये चार ठिकाणी तपासणी करून १५ हजार, सतरंजीपुरा झोन पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार दंड वसूल केला. आसीनगरमध्ये १२ तर लकडगंज झोनमध्ये १८ प्रतिष्ठानांची तपासणी केली. मंगळवारी झोनमध्ये १२ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.