शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

मनपाची आर्थिक घडी बसविणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:07 AM

मनपाची आर्थिक घडी बसविणार !आयुक्त राधाकृष्णन बी. : प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज : उत्पन्न वाढीसाठी टॅक्स वसुली ...

मनपाची आर्थिक घडी बसविणार !आयुक्त राधाकृष्णन बी. : प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज : उत्पन्न वाढीसाठी टॅक्स वसुली : प्रलंबित विकास प्रकल्पांना गती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांचे जीव वाचविणे महत्वाचे होते. रुग्णांना बेड उपलब्ध करण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले. लोकसंख्येचा विचार करता राज्यात नागपुरात सर्वाधिक बेड उपलब्ध करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. मनपाची आरोग्य यंत्रणा सक्षम केली. खासगी रूग्णालयांची मदत घेतली. आपण दुसऱ्या लाटेतून सावरलो. पण स्वस्थ बसून चालणार नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता प्रशासन सज्ज आहेे. लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या एकूणच अर्थव्यवस्थेवर व महसुली स्रोतावर परिणाम झाला आहे. याचा विचार करता टॅक्स वसुली व रखडलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करून मनपाची आर्थिक घडी बसविली जाईलल असा ठाम विश्वास मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ‘लोकमत’ शी बातचित करताना व्यक्त केला.

प्रश्न - कोरोनामुळे रखडलेल्या शहर विकासाचे काय?

आयुक्त - शहरातील नागरिकांना २४ बाय ७ पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ओसीडब्ल्यूचा प्रलंबित प्रकल्प मार्गी लावला जात आहे. यामुळे पाणी गळती कमी होईल. शहरात १० हजार स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम लवकरच पूर्ण होत आहे. अर्धवट सिमेंट रस्त्यांची सर्व कामे पूर्ण केली जात आहे. यासाठी १५६ कोटींची तरतूद केली आहे. दाणागंज येथील प्रलंबित मॉल प्रकल्पाचे काम सुरू होत आहे. शहरातील कचरा घनकचरा व्यवस्थपनाचा २६८ कोटींचा प्रकल्प राबविला जात आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. मेट्रो मॉल, ४० इलेक्ट्रीक बस, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यासह महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. कोरोना संकटाचा विकास प्रकल्पावर परिणाम होणार नाही. या दृष्टीने मनपाने नियोजन केले आहे.

प्रश्न- मनपाची बिघाडलेली आर्थिक स्थिती कशी सावरणार?

आयुक्त- कोरोचा संक्रमणाचा उत्पन्नावर परिणाम झाला. यातून मनपा सावरतेय. टॅक्स वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. थकबाकी वसुलीवर भर दिला जात आहे. नवीन आर्थिक स्रोत निर्माण केले जात आहे. अनावश्यक खर्चाला आळा घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

प्रश्न - एप्रिल महिन्यातील कोरोना प्रकोपावर मात कशी मात केली. ?

आयुक्त -कोरोनाच्या पहिल्या लाटेत टेस्टींग कमी होत्या. ३६ तासात रिपोर्ट मिळावा. यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. टेस्टींग वाढविण्यात आल्या. आरटीपीसीआर व एन्टीजन टेस्टची संख्या वाढविण्यात आली. यासाठी लागणारे साहित्य, यंत्रसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले. परिणामी रिपोर्ट लवकर मिळू लागले. ७.५३ लाख लोकांची चाचणी करण्यात आली. यामुळे रुग्णावर तातडीने उपचार करणे शक्य झाले. दुसरीकडे औषधी, इंजेक्शन, सर्जिकल साहित्य उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला. कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन ट्रेसिंग व टेस्टींगवर लक्ष केंद्रित केले. क्वारंटाईन सेंटरची व्यवस्था करण्यात आली. सोबतच लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यात यश आले. यासाठी विविध घटकांची मदत घेतली.

प्रश्न - बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध कसा घेतला?

आयुक्त - संक्रमण रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे गरजेचे होते. यासाठी काॅन्टॅक्ट ट्रेसिंग मोहीम राबविण्यात आली. आधी यासाठी ४० चमू होत्या. ही संख्या १९६ पर्यंत वाढविण्यात आली. कन्टेनमेन्ट झोनमध्ये घरोघरी सर्वे करण्यात आला. होम आयसोलेशनमध्ये ८५ टक्के रूग्ण होते. त्यांची देखरेख ठेवण्यासाठी आयसीएमआर व शासनाच्या दिशानिर्देशानुसार उपाययोजना करण्यात आल्या. कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आली. याचा चांगला परिणाम झाला.

प्रश्न - बाधितांना उपचार मिळण्यासाठी काय उपाययोजना केल्या ?

आयुक्त - रूग्णांना वेळीच उपचार मिळावे यासाठी मनपा कार्यालयात कोरोना वॉर रूम व नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. शासकीय व खासगी कोरोना रूग्णालयातील बेड या माध्यमातून गरजू रूग्णांना उपलब्ध करण्यात आले. खासगी रूग्णालयात नियमानुसार बिल आकारले जावे, यासाठी ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली. ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर बेडची संख्या आधी ६०० पर्यंत होती. ती ७५०० पर्यंत वाढविण्यात आली. रूग्णवाहिका झोन स्तरावर उपलब्ध करण्यात आल्या.

प्रश्न -ऑक्सिजन तुटवड्यावर मात कशी केली?

आयुक्त - एप्रिल महिन्यात कोरोना प्रकोप सुरू असताना देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा होता. नागपुरातही ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हते. याचा विचार करता आजूबाजूच्या जिल्ह्यातून ऑक्सिजन सिलेंडर गोळा करण्यात आले. बुटीबोरी येथील एक बंद पडलेली कंपनी सुरू करून ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली.

प्रश्न -हजारो अतिम संस्काराचा प्रश्न कसा सोडविला?

आयुक्त : संक्रमणाचा धोका असल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर नातेवाईकांना अंतिम संस्कार करता येत नव्हते. यासाठी मनपाने मोफत शववाहिका उपलब्ध केल्या. २०० कर्मचारी तैनात करण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी ही जबाबदारी दिवस -रात्र पार पाडली. यात बाहेरच्या राज्यातील व जिल्हयातील रूग्णांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.

प्रश्न - तिसरी लाट आल्यास कसा सामना करणार?

आयुक्त : कोरोची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा विचार करता मनपा प्रशासन सज्ज आहे. पुन्हा ६०० बेडची अतिरिक्त व्यवस्था केली जात आहे.