लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या दीड महिन्यात महापालिके ची पाच रुग्णालये सुसज्ज करण्यात आली आहेत. येथे ४५० बेडसह आयसीयू सुविधा उपलब्ध आहे. नागपूर शहरातील मेयो, मेडिकल रुग्णालयाच्या धर्तीवर आता महापालिकेच्या या रुग्णालयात रुग्णांना माफक दरात उपचार मिळणार आहेत. रुग्णालयांच्या अपग्रेडेशनवर सुमारे १०.५० कोटींचा खर्च अपेक्षित असून ७ कोटी खर्च करण्यात आले आहेत.गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय व पाचपावली स्त्री रुग्णालयात प्रत्येकी १३० बेडसह अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटरसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालय, काटोल रोड येथील के.टी.नगर रुग्णालय व सदर येथील आयुष रुग्णालय आठवडाभरात सुसज्ज होत असल्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’ला दिली.कोविड निधी, केंद्र सरकारकडून प्राप्त झालेला आरोग्य सुविधा निधी व महापालिकेच्या निधीतून हा खर्च केला जात आहे. या रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करण्यात आले आहेत. गरजेनुसार कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील सेवेचा दर्जा उंचावल्याने गरजूंना मेयो, मेडिकल रुग्णालयांवर विसंबून राहावे लागणार नाही. येथे माफक दरात उपचार उपलब्ध होतील असा विश्वास तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.इमामवाडातील आयसुलेशन हॉस्पिटलही बरेच जुने असून ते मागील अनेक वर्षापासून बंद आहे. या ठिकाणी अलिकडे फक्त ओपीडी सुरू होती. या इमारतीचा उपयोग कोरोना हॉस्पिटल म्हणून करण्यासाठी मुंडे यांनी प्रफुल्ल देशमुख अँड कंपनीला हे काम सोपविले. सोबतच इंदिरा गांधी रुग्णालयाचेही रुपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करण्याची जबाबदारी याच कंपनीकडे सोपविली. कंपनीचे प्रोप्रायटर प्रफुल्ल देशमुख यांनी गतीने हे काम पूर्णत्वास नेले. इमामवाडा आयसुलेशनचे काम १ मे पासून सुरू करून अवघ्या १० दिवसात पूर्ण करण्यात आले. इंदिरा गांधी रुग्णालयाचे काम १२ मे रोजी सुरू होऊन १४ जूनपर्यंत पूर्ण झाले.या हॉस्पिटलचे व्यवस्थापन करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. शहरातील कुठलाही रुग्ण वैद्यकीय उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी हे बदल केले असून याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.कोविड रुग्णांवर उपचारकोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोविड-१९ साथीचा उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेता, केंद्राच्या आदेशाप्रमाणे, गरज भासल्यास कोरोनाबाधित रुग्णांवर मनपाच्या रुग्णालयात उपचार केले जातील.
मनपाची पाच रुग्णालये सुसज्ज : ४५० बेडसह सर्व सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 8:31 PM
गेल्या दीड महिन्यात महापालिके ची पाच रुग्णालये सुसज्ज करण्यात आली आहेत. येथे ४५० बेडसह आयसीयू सुविधा उपलब्ध आहे. नागपूर शहरातील मेयो, मेडिकल रुग्णालयाच्या धर्तीवर आता महापालिकेच्या या रुग्णालयात रुग्णांना माफक दरात उपचार मिळणार आहेत.
ठळक मुद्दे१०.५० कोटीचा खर्च, आरोग्य सेवेचा दर्जा उंचावला