कर वसुलीसाठी नियोजन : २० जुलैपर्यंत डिमांड वाटप : झोननिहाय बैठकांचे सत्र
गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी करदादात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. परंतु मोठे थकबाकीदार पुढे येताना दिसत नाही. ३० जूनपर्यंत टॅक्स भरणाऱ्यांना १० टक्के सूट देण्यात आली. परंतु ४५,७९८ करदात्यांनीच याचा लाभ घेतला. तर १० जुलै पर्यंत ८७६६ लोकांनी ५०.८२ कोटी जमा केले. अर्थसंकल्पातील उद्दिष्टानुसार मनपाने कर वसुलीसाठी ‘मिशन ३३२ कोटी’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
मनपाच्या कर आकारणी व कर वसुली विभागाने शहरातील ६.५० लाख मालमत्ताधारकांना आर्थिक वर्षातील डिमांड २० जुलैपर्यत वाटप करण्याचे ठरविले आहे. ३० जूनपर्यंत ७८१५० करदात्यांनी ४५.८७ कोटी मनपा तिजोरीत जमा केले. मागील वर्षी या कालावधीत ४५७९८ करदात्यांनी २४.९१ कोटींचा महसूल जमा केला होता. या तुलनेत यंदा २४.९१ कोटींची वसुली अधिक असली तरी ३१ मार्च २०२२ पर्यंत ३३२ कोटींची कर वसुली करावयाची आहे. वेळेवर डिमांड मिळाली नाही तर अनेकांना कर भरता येत नाही. याचा विचार करता डिमांड वेळेवर पोहोचविण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
...
१० टक्के सवलतीचे ४५८४१ लाभार्थी
१५ ते ३० जून दरम्यान कर भरणाऱ्यांना १० टक्के सूट देण्याची योजना राबविण्यात आली. याचा ४५७९८ करदात्यांनी लाभ घेतला.या योजनेत मनपा तिजोरीत २७.१० कोटी जमा झाले. करदात्यांना २.५० कोटीहून अधिक सूट देण्यात आली. विशेष म्हणजे या योजनेपूर्वी कर भरणाऱ्यांनाही १० टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम पुढील वर्षाच्या बिलात समायोजित केली जाणार आहे
....
शास्ती माफीचा निर्णय आयुक्तांकडे
मनपा सभागृहात २२ जूनला ३ वर्षाच्या थकीत मालमत्ता करावरील दंडाची रक्कम माफ करण्याची घोषणा करण्यात आली. कोविड संक्रमणामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी ही घोषणा करण्यात आली. मात्र दंड माफ करण्याचा अधिकार मनपा आयुक्तांना आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
...
झोननिहाय बैठकाा
कर वसुलीसाठी झोननिहाय बैठका सुरू आहेत. झोन स्तरावर दर महिन्यासाठी कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २० जुलैपर्यंत डिमांड वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २४.९१ कोटींची वसुली अधिक आहे. ३३२ कोटींचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट गाठण्यासाठी दर महिन्यात नियोजन केले आहे.
मिलिंद मेश्राम, उपायुक्त महसूल मनपा
...
९ महिन्यात २८५ कोटी वसुलीचे नियोजन
महिना उद्दिष्ट (कोटी)
जुलै - १७
ऑगस्ट - २२
सप्टेंबर- २६
ऑक्टोबर -२६
नोव्हेंबर - २६
डिसेंबर- ३२
जानेवारी- ३८
फेब्रुवारी -३४
मार्च - ६०
....
अशी आहे त्रिसूत्री
-२० जुलैपर्यंत डिमांड वाटप
-झोन स्तरावर बैठकांचे नियोजन
-मार्चपर्यंत दर महिन्याला वसुली टार्गेट
....
असे आहेत मोठे थकबाकीदार
५ लाखांहून अधिक ६५९
१ ते ५ लाख २४०१
५० हजार ते १ लाख ५२२४
.............