लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने पाणीपट्टीत पाच टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. निवासींसोबत झोपडपट्टीवासीयांनाही ही वाढ सोसावी लागणार आहे. नागरिकांना प्रती युनिटमागे ३५ पैसे जादा द्यावे लागतील. यातून महापालिकेचे उत्पन्न १० ते १३ कोटींनी वाढण्याची अपेक्षा आहे.सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत जलप्रदाय विभागामार्फत पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. निवासी वापरासाठी १ ते २० व २१ ते ३०, ३१ ते ८० आणि ८० युनिट पुढे अशा प्रत्येक टप्प्यात ही दरवाढ केली जाणार आहे.निवासी वापरासाठी एका रुपयाची तर, झोपडपट्ट्यांसाठी ३३ पैसे ते एक रुपयांपर्यतची ही दरवाढ प्रस्तावित आहे. संस्थात्मक व व्यावसायिक पाणी वापराच्या शुल्कात अधिक वाढ करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सुधारित दरवाढ लागू केली जाणार आहे.कोरोना संसर्गात दरवाढीचा फटकापाणीपट्टीत दरवाढ ही प्रचलित व दरवर्षी होणारी असली तरी कोरोना संसर्गामुळे व्यावसायिक व नोकरदारांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यात पाणीपट्टी दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागणार आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात पाणीपट्टी दरवाढ केली जाते. मात्र यावर्षी उशिराने ही दरवाढ लागू केली जाणार आहे. यात सर्व स्तरातील पाण्याचे दर ३५ पैसे ते एक रुपयांपर्यंत वाढविण्यात आले.१३ कोटींचा महसूल वाढणारपुढील आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या माध्यमातून २६० कोटींचा महसूल अपेक्षित आहे. यात दरवाढीचे १३ कोटी गृहीत धरण्यात आलेले आहे.संस्थात्मक वापरासाठीच्या तीन स्तरातील ही वाढ आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेला थोडा का होईना पाणीपट्टी वसुलीतून हातभार लागण्याची आशा आहे.
मनपाचे पाणी महागणार : स्थायी समितीकडे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 8:35 PM
महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने पाणीपट्टीत पाच टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. निवासींसोबत झोपडपट्टीवासीयांनाही ही वाढ सोसावी लागणार आहे. नागरिकांना प्रती युनिटमागे ३५ पैसे जादा द्यावे लागतील. यातून महापालिकेचे उत्पन्न १० ते १३ कोटींनी वाढण्याची अपेक्षा आहे.
ठळक मुद्देसभागृहाच्या मंजुरीनंतर नवे दर लागू