लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने मंगळवारी नगरसेवक संदीप गवई व त्यांचे भाऊ हरीश यांचे धनादेश अनादराशी संबंधित अपील फेटाळून लावले. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला.४ मे २०१७ रोजी विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने गवई बंधूंची धनादेश अनादराची तक्रार तांत्रिक कारणावरून खारीज केली होती. त्या आदेशाला त्यांनी अपीलद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. प्रकरणातील माहितीनुसार, गवई बंधूंनी गोपालनगर येथील प्रतिभा तायडे यांच्या नावाने लायसन्स असलेल्या दहीद (बु.), जि. बुलडाणा येथील अमरोशिया वायनरीमध्ये भागीदारी करण्याचा प्रस्ताव स्वीकारला होता. त्याअंतर्गत दोन्ही पक्षांना प्रत्येकी ८० लाख रुपये वायनरीमध्ये गुंतवायचे होते. तसेच, वायनरीतून मिळणारा निव्वळ नफा समप्रमाणात वाटून घ्यायचे ठरले होते. दरम्यान, गवई बंधूंनी ५५ लाख रुपये वायनरीमध्ये गुंतविले व त्यानंतर भागीदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन ती रक्कम परत मागितली. त्यामुळे तायडे यांच्या पतींनी गवई बंधूंना ५५ लाख रुपयाचे पाच धनादेश दिले होते. त्यापैकी केवळ १५ लाख रुपयाचे धनादेश वटले. इतर धनादेश अनादरित झाले. परिणामी, गवई बंधूंनी प्रतिभा तायडे यांच्याविरुद्ध संबंधित तक्रार दाखल केली होती. तायडे यांच्यातर्फे अॅड. प्रदीप वाठोरे यांनी कामकाज पाहिले.
नगरसेवक संदीप गवई यांचे अपील फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 9:38 PM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नगरसेवक संदीप गवई व त्यांचे भाऊ हरीश यांचे धनादेश अनादराशी संबंधित अपील फेटाळून लावले. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला.
ठळक मुद्देहायकोर्ट : धनादेश अनादर प्रकरण