शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

बोअरवेलच्या कामात भ्रष्टाचार

By admin | Published: April 18, 2015 2:35 AM

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात तातडीच्या उपायोजना म्हणून मोठ्या प्रमाणात बोअरवेलची कामे करण्यात आली आहेत.

नागपूर : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात तातडीच्या उपायोजना म्हणून मोठ्या प्रमाणात बोअरवेलची कामे करण्यात आली आहेत. परंतु निविदातील निकषानुसार खोदकाम झालेले नाही. काही ठिकाणी पाणी नसतानाही हातपंप बसवून कंत्राटदारांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शुक्रवारी विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत केला.जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात पाणीपुरवठा विभागामार्फ त ५२ बोअरवेलची कामे करण्यात आली. अनेक ठिकाणी पाणी नसलेल्या बोअरवेलवर हातपंप बसविण्यात आले. यासाठी निविदातील निकष डावलून कमी जाडीच्या पाईपचा वापर करण्यात आला. तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी न करता लाखो रुपयांची बिले मंजूर केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांकडून बोगस बिलाची वसुली करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.आता चौकशी केली तरी बोअरवलेची कामे निकषानुसार झाली की नाही याची शहानिशा शक्य नाही. खोदकाम करतानाच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करणे गरजेचे होते, परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बोगस कामामुळे कंत्राटदारांनी शासकीय दराच्या तुलनेत २५ ते ३० टक्के कमी दराने कामे केल्याचे विरोधी सदस्यांनी निदर्शनास आणले. चार महिन्यांपूर्वी स्थायी समितीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु चौकशी न करता कंत्राटदारांना बिले देण्यात आली. काही कंत्राटदारांकडे बोअरवेलच्या दोन गाड्या असताना वेगवेगळ्या नावाने निविदा सादर करून सहा गाड्या असल्याचे दर्शविले आहे. सदस्य आक्रमक झाल्याने या प्रकरणाची चौकशी करून यात दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिले. उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती आशा गायकवाड, उकेश चव्हाण, पुष्पा वाघाडे, दीपक गेडाम, सदस्य रूपराव शिंगणे, मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)