बुलडाणा जिल्ह्यातील जल पुरवठा योजनेत भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:00 PM2018-08-06T23:00:52+5:302018-08-06T23:02:46+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील कारेगाव (ता. लोणार) येथे जल पुरवठा योजनेमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, बुलडाणा जिल्हाधिकारी व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

Corruption in Water Supply Scheme in Buldhana District | बुलडाणा जिल्ह्यातील जल पुरवठा योजनेत भ्रष्टाचार

बुलडाणा जिल्ह्यातील जल पुरवठा योजनेत भ्रष्टाचार

Next
ठळक मुद्देहायकोर्ट : राज्याचे मुख्य सचिव,जिल्हाधिकारी यांना नोटीस

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील कारेगाव (ता. लोणार) येथे जल पुरवठा योजनेमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, बुलडाणा जिल्हाधिकारी व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
मोहन हाडे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. कारेगावात पाणीटंचाई आहे. त्यामुळे सरकारने जल पुरवठा योजनेसाठी २००८ मध्ये १४ लाख, २०१३ मध्ये ३१ लाख तर २०१६ मध्ये ३४ लाख रुपये मंजूर केले. योजनेंतर्गत सहा किलोमीटरवरील कोनाटी धरणाजवळ विहीर खोदून गावापर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु, भ्रष्टाचारामुळे पाण्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. विजय वानखेडे व अ‍ॅड. अमोल चाकोतकर यांनी कामकाज पाहिले.

 

Web Title: Corruption in Water Supply Scheme in Buldhana District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.