ठळक मुद्देटाकळघाट येथे लाखोंची उधळपट्टीकारंजे पाण्याचे की पैशाचे?
आॅनलाईन लोकमतनागपूर : शेकडो कोटींच्या कामासाठी शासनाकडून सल्लागाराची नियुक्ती करण्यात येते. मात्र साध्या कारंजाच्या कामासाठी सल्लागाराच्या नियुक्तीला संशयाची झालर लागली आहे. हा एकप्रकारचा गैरव्यवहार असून अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संगनमताने होत असल्याची चर्चा जिल्हा परिषदच्या वर्तुळात आहे.हिंगणा तालुक्यातील टाकळघाट तीर्थक्षेत्र येथे संगीतमय कारंजे, लहान मुलांचे खेळांचे मैदान, भिंत, फुटपाथ रस्ता तयार करण्यात येणार आहे. यावर ४ कोटी ९९ लाख ७० हजारांचा खर्च करण्यात येणार आहे. यात १ कोटी ३० लाख रुपये संगीतमय कारंजावर खर्च करण्यात येणार आहे. तर खेळाचे मैदान करण्यासाठी ४५ लाख रुपये व फूटपाथ रस्त्यासाठी तब्बल २ कोटी २१ लाख खर्च करण्यात येणार आहे. हे बांधकाम करण्यासाठी वास्तुशास्त्रज्ञाची मदत घेण्यात आली असून त्याला १८ लाख ८५ हजार रुपये देण्यात येणार आहे. हे दर सल्लागारानुसार निश्चित करण्यात आले असून यासाठी संबंधित सल्लागारास लाखो रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आहे. प्रत्यक्ष बाजारदरापेक्षा हा जास्त खर्च असल्याची चर्चा असून यात गैरव्यवहार असल्याचीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. सामान्य जनतेकडून कराच्या माध्यमातून पैसा देण्यात येतो. विकास कामावर हा पैसा खर्च होणे अपेक्षित असताना वास्तुशास्त्रज्ञ, सल्लागारावर खर्च करून एकप्रकारे जनतेच्या पैशाची लूट असल्याचेच बोलल्या जात आहे. अशा अवाजवी खर्चावर वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे.