शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

‘रिसर्च रिसर्जन्स’ वर ११ पासून परिषद

By admin | Published: February 09, 2016 3:02 AM

विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरात एक चांगली सुरुवात होणार आहे.

स्मृती इराणी यांच्या हस्ते होणार उद्घाटन : संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी होणार मंथननागपूर : विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरात एक चांगली सुरुवात होणार आहे. यासाठी विदर्भातील विद्यापीठ व औद्योगिक संस्थांच्या समन्वयातून ‘रिसर्च रिसर्जन्स’ नावाने आंतरराष्ट्रीय परिषद ११ फेब्रुवारीपासून विश्वेश्वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याहस्ते होणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणतज्ज्ञ अनिरुद्ध देशपांडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. परिषदेत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, व्हीएनआयटी, गोंडवाना विद्यापीठ यांचाही सहभाग आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी १२ फेब्रुवारीला ‘शिक्षणात संशोधन आणि नाविन्यता’ या विषयावर केंद्रीय पर्यावरण, वनमंत्री प्रकाश जावडेकर आपले विचार व्यक्त करतील. याशिवाय ‘शैक्षणिक संशोधनात समाजाचा सहभाग’ याविषयावर सिंचनतज्ज्ञ माधव चितळे आपले विचार व्यक्त करतील. १३ फेब्रुवारीला भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटरचे डॉ.बी.एन. जगताप, डॉ.दातुक, इस्रोचे शास्त्रज्ज्ञ माधवन नायर, नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे हे ‘विज्ञान जगहिताय’ या विषयावर विचार व्यक्त करतील. दुपारी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ एस. गुरुमूर्ती ‘आयडिया आॅफ रिसर्जन्स’ या विषयावर मार्गदर्शन करतील. सायंकाळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. सारस्वत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप होईल. पत्रकार परिषदेला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, कुलसचिव डॉ. अरविंद जोशी, व्हीएनआयटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक डॉ. नरेंद्र जाधव, भारतीय शिक्षण मंडळाचे मुकुल कानिटकर, डॉ. सत्यवान मेश्राम, डॉ. उज्ज्वला चक्रदेव, डॉ. लीना गहाणे उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)