लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट परिसरात करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या मोजणीला सकाळी ८.३० वाजता सुरुवात होईल. मतमोजणीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळासह व्यवस्थेसंदर्भात नियोजन करुन आवश्यक सर्व सुविधा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी मंगळवारी दिल्यात.छत्रपती सभागृहात लोकसभा निवडणुकीसंदर्भातील प्रत्यक्ष मतमोजणीसाठी करावयाच्या व्यवस्थेचा आढावा नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी कळमना मार्केट परिसरात दोन स्वतंत्र हॉल तयार करण्यात येणार आहे. यामध्ये निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार यांच्यासह विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्यक्ष मतमोजणीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय होणार असून यासाठी प्रत्येकी १४ टेबलवर ही मतमोजणी होईल. मतमोजणीच्यावेळी संपूर्ण व्हिडिओग्राफी करण्यात येणार असून ५० व्हिडिओग्राफर यासाठी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. मतमोजणी अत्यंत पारदर्शक व सुरळीतपणे पार पडण्याच्यादृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिली.बैठकीला रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, उपजिल्हाधिकारी रवीद्रकुंभारे, अविनाश कातडे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, अन्नधान्य वितरण अधिकारी लीलाधर वार्डेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र भुयार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहसंचालक एस.आर. केकरे, लेखाधिकारी विनीत तिवारी आदी उपस्थित होते.केंद्रीय राखीव दलाच्या सुरक्षिततेखाली ईव्हीएममतदान झालेल्या ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये केंद्रीय राखीव दलाच्या सुरक्षिततेखाली ठेवण्यात आल्या आहेत. २३ मे रोजी सकाळी ६.३० वाजता विविध राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर उघडण्यात येतील. त्यानंतरमतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना प्रत्यक्ष मतमोजणी संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.अधिकाºयांवर सोपविली जबाबदारीभारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतमोजणी कक्षाची रचना तयार करणे, व त्यानुसार टेबलची मांडणी, प्रसार माध्यम केंद्र, संवाद कक्ष, अग्निशमन व्यवस्था तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा आदी पायाभूत सुविधांची जबाबदारी कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांच्याकडे राहणार आहे.मनुष्यबळ व्यवस्थापनाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांची असून तेथील सुरक्षा तसेच फेरीनिहाय मतमोजणी करण्याकरिता आवश्यक व्यवस्था जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे हे करणार आहेत.वाहन व्यवस्थेची जबाबदारी अन्नधान्य वितरण अधिकारी लीलाधर वार्डेकर, भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अन्न धान्य वितरण अधिकारी प्रशांत काळे तसेच अन्न व औषध प्रशासनाचे सहसंचालक एस.आर.केकरे हे करणार आहेत.सिलिंग व्यवस्था जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, मतदान यंत्राची वाहन व्यवस्था उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र भुयार आदी करणार आहेत.
मतमोजणी सकाळी ८ वाजतापासून : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 10:47 PM
लोकसभेच्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट परिसरात करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या मोजणीला सकाळी ८.३० वाजता सुरुवात होईल. मतमोजणीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळासह व्यवस्थेसंदर्भात नियोजन करुन आवश्यक सर्व सुविधा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी मंगळवारी दिल्यात.
ठळक मुद्देकळमना मार्केटमध्ये चोख व्यवस्थामतमोजणीसाठी १४ टेबलची व्यवस्थाप्रसार माध्यमांकरिता स्वतंत्र कक्ष