लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद निवडणूक आचार संहिता पार्श्वभूमीवर अवैद्य दारु निर्मिती व विक्री ठिकाणी छापे टाकून बुधवारी एक आपे रिक्षा, ५४० किलो काळा गुळ व ५० लिटर हातभट्टी दारु व १७ लिटर देशी दारु असा रुपये २ लाख 300 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन ९ आरोपींना अटक करण्यात आली.५ जिल्हाधिकारी मा. रवींद्र ठाकरे साहेब व विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे तसेच अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी जिल्हा परिषद निवडणूक आचार संहिता काळात विशेष मोहिमा राबवून प्रोहीबिशन रेड्स करुन अवैद्य मद्य निर्मिती व विक्री वर कारवाईचे आदेश दिले आहेत.५ त्या अनुषंगाने बुधवारी केलेल्या या मोहिमेत गिट्टीखदान व यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य मद्य निर्मिती व विक्री ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली.यावेळी गिट्टी खदान पोलीस स्टेशन हद्दीत खिवसनखोरी येथे हातभट्टी दारु निर्मिती साठी काळ्या गुळाची आवक होणार असल्याची माहिती मिळाल्या वरून छाप्याचे नियोजन केले असता विमलाबाई मेश्राम हिच्या कडे हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणी काळा गुळ उतरवत असताना आपे रिक्षा क्रमांक टऌ 40 अङ 1445 हे वाहन व त्यातील काळ्या गुळाच्या 12 किलोच्या 20 ढेपा व 30 किलो ची 10 पोती ताब्यात घेण्यात आली तसेच हा विमलाबाई मेश्राम हिच्या घरातील 20 लिटर तयार हातभट्टी दारु जप्त करण्यात आली. याच बरोबर भिवसन खोरी मधील अन्य तीन ठिकाणी छापे टाकून मोहा दारु जप्त करण्यात आली. याच बरोबर यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीत चार ठिकाणी अवैद्य मद्य विक्री ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली.५ या कारवाईत (१) जगदीश मुन्नीलाल गुप्ता, (२) विमल भोपाल मेश्राम, (३) इंदूबाई जनार्दन घोडेस्वार, (४) शकुंतला किशोर डोंगरे, (५) राधिकाबाई गुलाब खोब्रागडे,(६) गोपाल विठोबा बावणे, (७) इंदूबाई वामनराव थोरात, (८) विजय पांडुरंग हेडाऊ, (९) प्रभाकर रामचंद्र कोडापे इत्यादींच्या वर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदरची कारवाई उप अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर व एस एम मिरकले यांच्या मार्गदर्शना खाली निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी केली. या कारवाईत अरक प्रशांत येरपुडे व कवडू रामटेके, जवान राहुल पवार, महादेव कांगणे, महिला जवान सोनाली खांडेकर व वाहन चालक रवी निकाळजे यांनी भाग घेतला.
नागपुरात देशीदारूसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 11:38 AM