लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात विशिष्ट समाजाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे देशात असंतुलित वातावरण निर्माण होण्याची भीती आहे. देशात हिंदूंचे घटणारे प्रमाण देशाची ओळख व अस्तित्वासाठी धोका बनत आहे. याशिवाय आर्थिक विकास, नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच कार्यक्षमतेवर परिणाम करीत आहे. यामुळे देशात समान लोकसंख्या धोरण लागू करायला हवे, अशी भूमिका राष्ट्रसेविका समितीतर्फे घेण्यात आली आहे. समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी व प्रतिनिधी मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत समान लोकसंख्या धोरणासंदर्भातील प्रस्ताव संमत करण्यात आला.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात ही बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का व प्रमुख कार्यवाहिका सीता अन्नदानम् प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला. १९५१ साली देशात हिंदूंची संख्या ८८ टक्के होती. आता हा आकडा ८० टक्क्यांहून खाली आला आहे. काश्मीर, बिहार व बंगालमधील तीन जिल्हे, केरळमधील दोन जिल्हे व आसाममधील नऊ जिल्ह्यांसह उत्तर प्रदेशच्या काही भागात सामाजिक सौहार्द संपत चालला असल्याचे अलीकडच्या घटनांमधून दिसून येत आहे. अनेक ठिकाणी राज्य सरकारदेखील कमकुवत आहेत. लोकसंख्येचे असंतुलन भारताच्या अखंडतेवरदेखील संकट निर्माण करणारे आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने संपूर्ण देशासाठी समान लोकसंख्या धोरणाला लागू करावे, सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीवर नियंत्रण आणावे, ‘एनआरसी’ संपूर्ण देशात लागू करावे, बेकायदेशीरपणे राहणाºया विदेशींना बाहेर काढावे, अशा नागरिकांना भारताची नागरिकता मिळू नये तसेच त्यांना अचल संपत्ती खरेदी करण्याचे अधिकार असू नयेत अशी व्यवस्था उभारावी, अशी भूमिका समितीतर्फे या बैठकीत मांडण्यात आली. अनेक देशांमध्ये धर्मांतरणामुळे देशाच्या सुरक्षेवर संकट येते व सामाजिक संघर्षदेखील निर्माण होतो. जगातील अनेक देशांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे धर्मांतरणावर बंदी आणण्यासाठी प्रभावी कायदा लागू केला पाहिजे, असादेखील बैठकीतील सूर होता.देश प्रगतिपथावर आहेयावेळी शांताक्का यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. देश सर्वच क्षेत्रात प्रगतिपथावर आहे. एकत्रित प्रयत्नातून व महिलाशक्तीच्या नेतृत्वातून चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात यश आले. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. संकल्पाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची गरज आहे. दृढसंकल्प, इच्छाशक्तीला उद्यमशीलतेची जोड मिळाली तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.देशभरात तरुणींसाठी आत्मसुरक्षा मोहीम राबविणारया बैठकीमध्ये देशभरातून दोनशेहून अधिक समिती सदस्य सहभागी झाल्या होत्या. पुढील वर्षभरात संपूर्ण देशातील विविध ठिकाणी तरुणींसाठी आत्मसुरक्षा मोहीम राबविण्यात येणार आहे. सोबतच बालिका, तरुणी, गृहिणी, उद्योजिका इत्यादींसाठी विशेष कार्यक्रम निश्चित झाले. राष्ट्रसेविका समितीच्या द्वितीय प्रमुख संचालिका सरस्वतीबाई आपटे यांचे २५ वे स्मृतिवर्ष आहे. त्यांच्या विचारांचा जागर या वर्षभरात करण्यात येणार आहे.
देशात समान लोकसंख्या धोरण हवे : राष्ट्रसेविका समितीची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:51 AM
देशात विशिष्ट समाजाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे देशात असंतुलित वातावरण निर्माण होण्याची भीती आहे. देशात हिंदूंचे घटणारे प्रमाण देशाची ओळख व अस्तित्वासाठी धोका बनत आहे. याशिवाय आर्थिक विकास, नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच कार्यक्षमतेवर परिणाम करीत आहे. यामुळे देशात समान लोकसंख्या धोरण लागू करायला हवे, अशी भूमिका राष्ट्रसेविका समितीतर्फे घेण्यात आली आहे. समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी व प्रतिनिधी मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत समान लोकसंख्या धोरणासंदर्भातील प्रस्ताव संमत करण्यात आला.
ठळक मुद्देअखिल भारतीय कार्यकारिणी बैठक संपन्न