लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘एक्झिट पोल्स’मधून व्यक्त झालेले अंदाज हे अंतिम आकडे नसले तरी ते निकालांचे निर्देशकच आहेत. देशाच्या जनतेने परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला समर्थन दिले आहे असेच यातून दिसून येत आहे. देशाचा मोदींवर विश्वास आहे व तेच पुढील पंतप्रधान होतील. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या ‘पोस्टर’च्या अनावरणप्रसंगी ते त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सिंह, अभिनेता विवेक ओबेरॉय हे प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान मोदींमुळे जगभरात देशाचा लौकिक वाढला आहे. देशाला सगळीकडे मानसन्मान मिळतो आहे. ५० वर्षात झाला नाही तेवढा विकास पाच वर्षांत झाला. देशाने विकासाभिमुख व भ्रष्टाचारमुक्त सरकार अनुभवले. यंदाच्या निवडणुकीत ‘रालोआ’ला २०१४ च्या तुलनेत अधिक जागा मिळतील असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. मला कुठले मंत्रिपद मिळेल याचा सर्वस्वी निर्णय पंतप्रधान घेतील, असेदेखील गडकरी यांनी स्पष्ट केले.शहजादे, अब होगा न्याय !मागील पाच वर्षांत भारत बदलला आहे. देशात घराणेशाहीचे दिवस ओसरले असून आता वडिलांचे नाव नव्हे व्यक्तीचे काम चालेल. २३ मे रोजी निकाल लागल्यानंतर खऱ्या अर्थाने शहजादे, अब होगा न्याय, या शब्दांत विवेक ओबेरॉयने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दोन्ही कर्मठ नेते आहेत. त्यांचे कर्तृत्व हीच त्यांची ओळख आहे. चित्रपट जगताच्या भाषेत सांगायचे झाल्यास मोदी आणि गडकरी हे ‘अॅक्शन हिरो’ आहेत. जे लोक ‘कमिशन’ खाण्यासाठी कुख्यात आहेत, त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे आणले, असा आरोपदेखील विवेक ओबेरॉयने केला. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एकता नसल्याची खंतदेखील त्याने बोलून दाखविली.
देशाचा मोदींवर विश्वास, तेच पुढील पंतप्रधान : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:48 PM
‘एक्झिट पोल्स’मधून व्यक्त झालेले अंदाज हे अंतिम आकडे नसले तरी ते निकालांचे निर्देशकच आहेत. देशाच्या जनतेने परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला समर्थन दिले आहे असेच यातून दिसून येत आहे. देशाचा मोदींवर विश्वास आहे व तेच पुढील पंतप्रधान होतील. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या ‘पोस्टर’च्या अनावरणप्रसंगी ते त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.
ठळक मुद्दे‘एक्झिट पोल’ निकालांचे निर्देशकच